पडीत जमिनीवर पिकविले भाजीचे मळे, कुडाळ मधील प्रगतशील शेतकऱ्यांची सामूहिक शेती

0
186

सिंधुदुर्ग – कुडाळ तालुक्‍यातील काही प्रगतशील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन सामुदायिक शेतीची संकल्पना रुजवली आहे. आंबडपाल आणि येथील एमआयडीसी गणेशवाडी येथे सूर्यकांत कुंभार, जयराम परब व तानाजी सावंत यांनी एकत्र येऊन काही एकर पड जमिनीवर भाजीचे मळे फुलवले आहेत. ते देखील 100 टक्‍के सेंद्रिय. कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पन्न घेऊन या तरुण शेतकऱ्यांनी गावागावात बेरोजगार असलेल्या तरुणांना एक नवी दिशा दाखवली आहे.

गेले सहा महिन्यात लॉकडाऊनमुळे अनेकांचे कंबरडेच मोडले आहे. अनेक जणांना उद्योगधंदे बंद करावे लागले. बऱ्याच जणांना नोकरीवर पाणी सोडावे लागले. मोलमजुरी करणाऱ्यांचे रोजगार बुडाले. अशा कठीण परिस्थितीत उदरनिर्वाहासाठी नेमके करायचे काय? असा प्रश्‍न अनेकांना पडला. नेमके याच कठीण वेळी अनेकांचे लक्ष वर्षानुवर्षे पडीक असलेल्या जमीनीकडे गेले. ज्या जमिनीवर अनेक वर्षे कोणी फिरकले नव्हते, तेथे नांगर फिरले. पेरणी झाली आणि आता तर पिकं बऱ्यापैकी डोलत आहे; मात्र यापुढे जाऊन तालुक्‍यातील काही प्रगतशील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन सामुदायिक शेतीची संकल्पना रुजवली आहे.

आंबडपाल आणि कुडाळ एमआयडीसी गणेशवाडी येथे सूर्यकांत कुंभार, जयराम परब व तानाजी सावंत यांनी एकत्र येऊन काही एकर पड जमिनीवर भाजीचे मळे फुलवले आहेत आणि ते देखील 100 टक्‍के सेंद्रिय. कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पन्न घेऊन या तरुण शेतकऱ्यांनी गावागावात बेरोजगार असलेल्या तरुणांना एक नवी दिशा दाखवली आहे.

एमआयडीसीवरून माड्याच्यावाडीला जाणाऱ्या रस्त्याच्या डाव्या बाजूला नजर गेली, तर काही एकरमध्ये भाजीचा मळा पिकविला आहे. याकडे सर्वांचे लक्ष निश्‍चितच वेधून घेईल. यामध्ये वेगवेगळ्या जातीच्या मिरच्या, काकडी, शिराळी, भोपळा, दुधी भोपळा, भेंडी, पडवळ, लालपाला भाजी, मुळा भाजी इत्यादी प्रकारची भाजी पहावयास मिळते. या भाजीच्या मळ्यात जाऊन प्रत्यक्ष वेलीवर लागलेली भाजी पाहून त्यातील भाजी खरेदी करण्यातील मजा काही औरच असते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here