चिपी विमानतळ गणेशचतुर्थीला सुरु होईल – विनायक राऊत

0
104

सिंधुदुर्ग – जिल्ह्यातील बहुचर्चित चिपी विमानतळावरून गणेशचतुर्थी पुर्वी विमान प्रवास सुरू होणार असल्याची माहिती शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी दिली आहे. स्थानिक आमदार दिपक केसरकर यांच्या समवेत विनायक राऊत यांनी चिपी विमानतळाची पाहणी केली यानंतर ते माध्यमांशी बोलत होते.

डीजीसीए आणि एयरर्पोट अथॉरिटीने ज्या दुरूस्त्या सुचवल्या होत्या त्याचं तंतोतंत पालन करून एअरपोर्ट आता वाहतूकी साठी सज्ज झालेला आहे. तीनशे ते साडेतीनशे कर्मचारी आणि पंजाब वरून मशिनरी मागवली होती. असे त्यांनी सांगितले.

तर बाहेरून इतर टेक्नॉलॉजी मागवली होती. त्यांनी रनवेच्या पुर्नबांधणीचं काम व्यवस्थित केलं आहे असेही विनायक राऊत यांनी यावेळी सांगितले.

या कामाचा कंपल्शन रिपोर्ट आयआरबी कंपनीने डीजीसीए कडे पाठवलेला आहे. आता डीजीसीएने पाहणी करून लाईसन्स दिले की कोणत्याही क्षणी विमान वाहतूक सूरू होईल.

विमान कंपनीचे अधिकारी इथे येऊन थांबलेले आहेत. त्यांचे टीकिट काऊंटर देखील रेडी झालेले आहेत. त्यामुळे लायसन्स मिळाल्याच्या आठ दिवसात हा एअरपोर्ट सुरू होईल. अशी माहिती खासदार विनायक राऊत यांनी यावेळी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here