गाळेल येथे डोंगर कोसळून मातीच्या ढिगाऱ्यात सापडलेल्या “त्या” युवकाचा शोध सुरू, प्रशासना समोर मोठे आव्हान…

0
200

सिंधुदुर्ग – गाळेल येथे डोंगर कोसळून मातीच्या ढिगाऱ्यात सापडलेल्या युवकाचा शोध घेण्याचे काम प्रशासनाकडून युद्धपातळीवर सुरू आहे.त्यासाठी १ पोकलँड व तीन जेसीबी मशीनच्या साहाय्याने ही शोधमोहीम सुरू आहे.

सुमारे दोन एकरहून अधिक भागातील डोंगर कोसळून खाली आल्याने त्या युवकाचा शोध घेण्याचे कठीण आवाहन प्रशासनाच्या समोर आहे. एनडिआरएफच्या २१ जवानांची टीम घटनास्थळी दाखल झाली आहे. सिंधुदुर्ग पोलिसांचे बॉम्ब शोधक पथकाचे कर्मचारी देखील दाखल झाले आहे.

मेटल डिटेक्टरद्वारे गाडीचा शोध सुरू आहे. सावंतवाडी तहसीलदार राजाराम म्हात्रे, नायब तहसीलदार प्रदीप पवार, पोलीस निरीक्षक अनिल जाधव, महसूल मंडळ अधिकारी आर व्ही राणे, तलाठी वर्षा नाडकर्णी, बांधकाम खात्याचे सहायक अभियंता अमित कल्याणकर आदी घटनास्थळी ठाण मांडून आहेत.

मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेला युवक हा वेंगुर्ले तालुक्यातील मठ गावातील रहिवासी आहे. त्यामुळे मठ येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने घटनास्थळी आले आहेत.

गाळेल व डिंगणे येथील स्थानिक ग्रामस्थांनीही प्रशासनाच्या शोध मोहिमेत सहभाग घेतला आहे.. पावसाचा जोर असल्याने याठिकाणी चिखल निर्माण झाला आहे, त्यामुळे शोध कार्यात अडचणी येत आहेत.

जोपर्यंत मातीच्या ढिगाऱ्याखाली गडाला गेलेला तरुण सापडत नाही तोपर्यंत मदतकार्य थांबवणार नाही असे सावंतवाडीचे तहसीलदार राजाराम म्हातारे यांनी सांगितले आहे.

एनडिआरएफचे टीम कमांडर प्रभातकुमार यादव यांनी सांगितले कि त्याठिकाणची मोठ्या प्रमाणात आलेली माती बाजूला हटविली गेल्यावरच आमचं काम सुरु होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here