कोरोनाने झालेल्या मृत्यूला सरकार जबाबदार, भाजपा खासदार नारायण राणे यांचा कणकवलीत आरोप

0
163

सिंधुदुर्ग – सर्वच रोगांच्याबाबतीत सरकार माकडचेष्टा करतंय. सरकार गंभीर नाही. जनतेचं आरोग्य राखण्यासाठी हे सरकार असमर्थ ठरलेलं आहे. जिल्ह्यात कोरोनामुळे जे बळी गेले त्याला सरकार जबाबदार आहे. असा गंभीर आरोप भाजपा खासदार नारायण राणे यांनी राज्यसरकारवार केला आहे. जिल्ह्यात मेडिकल कॉलेजला परवानगी देण्याचा राज्यसरकारला अधिकारच नाही असेही त्यांनी यावेळी सांगितले.

जिल्ह्यात माकडतापाचे संकट तोंडावर असताना अद्यापही शासनाकडून लस आलेली नाही. यावर बोलताना खासदार नारायण राणे म्हणाले कि सर्वच आजाराच्या बाबतीत सरकारने माकडचेष्टा चालवली आहे. जिल्ह्यातील जनतेने स्वतःच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी स्वतः कटिबद्ध व्हावे. या जिल्ह्यात कोरोनाचे जे बळी गेले त्याला सरकार जबाबदार आहे. जिल्हा कोविड रुग्नालयात डॉक्टर नाहीत, स्टाफ नाही, टेक्निशियन नाही, यंत्रसामग्री नाही, कर्मचारी नाहीत आणि अशा वेळी दुसरं हॉस्पिटल उभारताहेत. एकमेकाला पेढे भरवताहेत. अशी यांची कार्यपद्धती आहे. मला वाटत आमचं हॉस्पिटल सुसज्ज आहे. अत्याधुनिक यंत्रसामग्री आहे. पुरेशे डॉकटर स्टाफ किंवा टेक्निशियन आहेत. त्यामुळे पडवेच हॉस्पिटल या जिल्ह्यातील लोकांचे प्राण वाचवायला प्रयत्नशील आहे. असे ते म्हणाले. ते कणकवली येथे बोलत होते.

शिवसेनेचे पालकमंत्री व सगळे लोकप्रतिनिधी थापाडे

जिल्ह्यात राज्य सरकारने मंजूर केलेल्या शासकीय मेडिकल कॉलेजबद्दल बोलताना नारायण राणे म्हणाले, कि राज्यसरकारला अधिकार आहे का, मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल द्यायचा. काय अधिकार नाही. हे बोगस आहेत सगळे. शिवसेनेचे लोकप्रतिनिधी, पालकमंत्री सगळे बोगस आहेत. थापा मारतात, लोकांची दिशाभूल करतात. अशी का हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेज दिली जातात का ? केंद्राच्या एमसीआई ची परवानगी लागते. आधी आहे ते हॉस्पिटल व्यवस्थांची करा. त्याच्यामध्ये डॉकटर, स्टाफ, नर्स नाहीयेत. दुर्दशा चाललेली आहे. असे सांगतानाच किती लोक मेली आपल्या जिल्ह्यात कोरोनामुळे ते पहा असेही राणे यावेळी म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here