कणकवली – ज्या शिक्षकांनी जागतिक महामारी (कोव्हिड-१९) च्या काळातही निरंतर शिक्षणकार्य केले आणि नवकल्पना राबवित असंख्य विद्यार्थ्यांसाठी ज्ञानार्जन सुरू ठेवले अशा शिक्षकांचा सन्मान करण्यात येणार आहे. समाजसेवक आणि एस.आर. दळवी (आय) फाऊंडेशनचे सहसंस्थापक श्री. रामचंद्र दळवी (आबा) यांच्या वतीने सदर शिक्षकांचा गौरव केला जाणार आहे. अशी माहिती रामचंद्र दळवी स्मिता दळवी यांनी कणकवलीत पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी डॉक्टर नयन भीडा हे उपस्थित होते. रामचंद्र दळवी या संदर्भात माहिती देताना पुढे म्हणाले नाविण्यपूर्ण शिक्षक- प्राथमिक विभाग (इय़त्ता १ ली ते इयत्ता ७ वी), नाविण्यपूर्ण शिक्षक- माध्यमिक विभाग (इयत्ता ८ वी ते १२ वी), नाविण्यपूर्ण प्राध्यापक- महाविद्यालयीन पदवी विभाग, नाविण्यपूर्ण प्राध्यापक – अभियांत्रिकी महाविद्यालय, नाविण्यपूर्ण प्राध्यापक- व्यवस्थापन महाविद्यालय, नाविण्यपूर्ण प्राध्यापक- वैद्यकीय महाविद्यालय असे पुरस्कार एस आर दळवी फाउंडेशन च्या वतीने देण्यात येणार आहेत.
विद्यार्थी हितासाठी महामारीच्या काळात केलेले नाविण्यपूर्ण कार्याचे छायाचित्र किंवा ध्वनीमुद्रण(व्हिडीओ) सह केवळ २०० शब्दांमध्ये टीचर्स टॉक ( TCHRTalk) या ऍपद्वारे सादर करावे. शिक्षकांनीही याच ऍपद्वारे वरील अटीसह नामांकन भरणे आवश्यक आहे. या प्रत्येक श्रेणीमधून प्रत्येकी दोन शिक्षकांची निवड सदर पुरस्कारासाठी केली जाणार आहे.
३० सप्टेंबर, २०२१ पूर्वी नामांकन सादर करणे आवश्यक आहे. आपल्या सहशिक्षकाला पुरस्कार मिळावा यांसाठी संपूर्ण राज्यातील शाळा तसेच महाविद्यालयांतील इतर शिक्षकांनी यासाठी मतदान करता येणार आहे. टीचर्स टॉक ( TCHRTalk) या ऍपद्वारे मतदान करता येईल. शिक्षकांच्या मतदानाला ९० ट्क्के गुण तर पुरस्कार निवड समितीचे मत १० टक्के विचारात घेतले जाणार आहे. ७ ऑक्टोबर रोजी या पुरस्कारप्राप्त शिक्षकांची नावे मुंबईत होणाऱ्या कार्यक्रमात जाहिर केली जातील. “ग्रामीण भागात ज्या ठिकाणी तांत्रिक सहाय्य देणे परवडत नाही अशा ठिकाणी अनेक शिक्षकांनी ज्ञानार्जनाचे काम अविरतपणे सुरू ठेवले आहे. अशा कठिण प्रसंगी शिक्षकांनी केलेल्या योगदानाचे यथोचित कौतुक व्हावे, त्यांचा सन्मान व्हावा या उद्देशानेच हे पुरस्कार देण्याचे योजले आहे“ असे समाजसेवक आणि एस. आर.दळवी (आय) फाऊंडेशनचे सहसंस्थापक श्री. रामचंद्र दळवी म्हणाले. “समाजाच्या उभारणीचा पाया रचण्याचे काम शिक्षक करत असतात. ५ ट्रिलीयन डॉलर्स अर्थव्यवस्था निर्माण करण्यासाठीचा नवीन भारताचा आधारस्तंभ असेच या शिक्षकांना संबोधले पाहिजे. “ असे दळवी पुढे म्हणाले.
मार्च २०२० पासून देशाव्यापी ताळेबंद (लॉकडाऊन) जाहिर झाला त्याबरोबर शिक्षण संस्था बंद ठेवण्याचे आदेश जाहिर झाले. त्यामुळे तांत्रिक उपाय शोधत शिक्षणात सातत्य सुनिश्चित करण्यासाठी पायाभूत सुविधा सुधारण्याची तातडीने गरज निर्माण झाली. अचानक उद्भवलेलेल्या या परिस्थितीतही शिक्षकांनी धैर्याने सामना केला आणि असंख्य अडथळे पार करत, ज्ञानार्जन सुरूच ठेवले त्यासाठी अनेक शिक्षकांनी नाविण्यपूर्ण उपक्रम, तंत्रपद्धतींचा वापर केला आहे त्यामुळे विद्यार्थांसमोरील शिक्षणाबाबतीतले अडथळे दूर होण्यास मदत झाली आहे.
टीचर्स टॉक (TCHRTalk) हे एक असाधारण ऍप्लीकेशन आहे जे शिक्षक आणि त्यांच्या सहशिक्षकांना जोडण्यासाठीचे व्यासपीठ आहे. या ऍपद्वारे मतमतांतरांची देवाणघेवाण, अडचणी सामायिक (शेअर) करण्यासोबतच त्या सोडविण्यासाठी मदत होऊ शकते. याशिवाय शिक्षण क्षेत्रांतील विविध रोजगार संधी आणि शिक्षण समुदायाच्या बळकटीकरण्यासाठी तसेच शिक्षकांच्या सक्षमीकरणासाठी हे ऍप गुगल प्लेस्टोअर्सवर उपलब्ध असून तेथून डाऊनलोड करणे शक्य आहे. पुरस्कारासाठी नामांकन करणाऱ्या शिक्षकांनी या ॲप वर आपले केलेले नाविन्यपूर्ण काम 200 शब्दात डाउनलोड करायचे आहे. या शिक्षकांचा पुरस्करा सोबतच गौरव करण्यात येणार आहे. स्मिता दळवी म्हणाल्या ग्रामीण भागात ऑनलाईन शिक्षणात च्या कामात शिक्षकांनी मॅच करून घेणे हे फार कठीण होते. तरीही काही शिक्षकांनी उत्कृष्टपणे काम केले. देशभरातील शिक्षक या ॲपच्या माध्यमातून एकत्र होत असताना शिक्षकांना हा एक डिजिटल प्लॅटफॉर्म देण्याचा आमचा प्रयत्न आहे. सर्व स्तरातील शिक्षक या ॲप वर आपले काम प्रदर्शित करू शकतात. यात ट्युशन घेणाऱ्या शिक्षकांचाही सहभाग होणार आहे असेही दळवी यांनी सांगितले.