कुणकेश्वरला हापूस आंब्याची आरास, कोविड योध्यांना देण्यात येणार हे आंबे

0
84

 

सिंधुदुर्ग – सध्या कोकणात आंब्यांचा सिझन आहे मात्र हापूसवर होणाऱ्या नैसर्गिक आपत्तीत हवामानाचा परिणाम तसेच देवगड हापूस अर्थकारण बदलावे आणि भरभराट व्हावी यासाठी बागायतदारांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील श्री क्षेत्र कुणकेश्वर चरणी देवगड हापूस अर्पण केले आहेत. यावेळी कोरोनाचे संकट लवकरात लवकर दूर होऊन बाजारात लॉकडाऊनमुळे अडकलेल्या हापूसला चांगला भाव मिळण्यासाठीही अनोख्या पद्धतीने कुणकेश्वर चरणी साकडे घालण्यात आले. दरम्यान कोरोनाशी दोन हात करण्याऱ्या कोविड योध्यांना हे आंबे देण्यात येणार आहेत.

कोरोनाशी दोन हात करण्याऱ्या कोविड योध्यांना देण्यात येणार हे आंबे

कुणकेश्वर एक तिर्थक्षेत्र आणि पर्यटन स्थळ म्हणून ओळखलं जातं. त्यासोबतच हे गाव हापूस आंब्यांसाठी प्रसिद्ध आहे. कुणकेश्वर हे एक शिवमंदिर असून छत्रपती शिवरायांनी स्वतः या मंदिराचा जीर्णोद्धार केला होता. श्री कुणकेश्वराला केलेल्या या आरासामधील हापूस आबे कोरोनाशी दोन हात करण्याऱ्या आरोग्य, महसूल आणि पोलीस कर्मचाऱ्यांना देण्यात येणार आहेत. अशी माहिती देवस्थान कमिटी कडून देण्यात आली आहे.

हापूसवर वारंवार येणारी नैसर्गिक आपत्ती आहे नुकसानकारक

सुमारे 1001 देवगड हापूस आंब्यांची आरास कुणकेश्वर चरणी करण्यात आली. सध्या कोकणात आंब्याचा सीजन आहे. मात्र हापूसवर वारंवार येणारी नैसर्गिक आपत्ती, हवामानाचा परिणाम तसंच देवगड हापूसचे अर्थकारण बदलावं आणि उत्पनात भरभराट व्हावी, यासाठी शेतकऱ्यांनी श्री क्षेत्र कुणकेश्वर चरणी देवगड हापूस अर्पण केले आहेत. कुणकेश्वर हि कोकणाची दक्षिण कशी म्हणून ओळखली जाते. येथील लोकांची या देवावर मोठी श्रद्धा आहे. या श्रद्धेतून कुणकेश्वरला हे साकडे घालण्यात आले आहे.

कोरोनाचे समूळ उच्चाटन व्हावे असे साकडे

यावेळी जगावर आलेले कोरोनाचे संकट लवकरात लवकर दूर व्हावे यासाठी गाऱ्हाणे मंदिरातील पुजाऱ्यानी श्री देव कुणकेश्वराला घातले. दक्षिण कोकणची काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या सिंधुदुर्गातील कुणकेश्वर येथील महादेवाच्या मंदिरात, शंकराची पिंड आणि नंदीला हापूस आंब्यांची आरास करण्यात आली आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे सध्या लॉकडाऊनची स्थिती आहे. अशावेळी इथला हापूस बागायतदारही आंब्याला गिऱ्हाईक मिळत नसल्याने हवालदिल झाला आहे. त्यामुळे या माध्यमातून त्याने कुणकेश्वरला कोरोनाचे समूळ उच्चाटन व्हावे असे साकडे घातले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here