कुडाळ:येथील कचरा डेपोला लागलेली आग दुसऱ्या दिवशीही धुमसत असल्याने आमदार निलेश राणे यांनी आज घटनास्थळाची पाहणी करत आक्रमक पवित्रा घेतला. प्रशासकीय ढिसाळ कारभारामुळे संतप्त झालेल्या आमदारांनी नगरपंचायतीचे मुख्याधिकारी औंधकर यांना कडक शब्दांत जाब विचारला. ही आग लावली असल्याच्या संशयावरून केवळ ‘NC’ नको, तर संशयितांविरुद्ध तातडीने ‘FIR’ दाखल करण्याचे स्पष्ट निर्देश त्यांनी मुख्याधिकाऱ्यांना दिले.
आमदार राणे यांनी पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांच्याशी संपर्क साधून कठोर कारवाईची सूचना केली. तसेच शहराच्या विकासाचा आराखडा आठ दिवसांत सादर करण्याचे आदेश मुख्याधिकाऱ्यांना दिले. यावेळी नगराध्यक्षा प्राजक्ता बांदेकर, उपनगराध्यक्ष किरण शिंदे, नगरसेवक अभी गावडे, विलास कुडाळकर, निलेश परब, संध्या तेरसे, श्रुती वर्दम यांच्यासह संजय पडते, राकेश कांदे व अन्य पदाधिकारी उपस्थित होते. धुरामुळे त्रस्त असलेल्या नागरिकांना दिलासा देण्यासाठी प्रशासनाने तातडीने पावले उचलण्याची मागणी यावेळी करण्यात आली.



