कणकवलीत भाजपा कडून “ॲक्शन” ला “रिऍक्शन”

0
59

सिंधुदुर्ग – जिल्ह्यात शिवसेना विरुद्ध भाजपा चे बॅनरवॉर सुरू झालेली असतानाच आता पुन्हा रविवारी संध्याकाळी नारायण राणे यांच्या संपर्क कार्यालयाकडे रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव, हीरक महोत्सव, अमृत महोत्सव, शताब्दी महोत्सव अशा महोत्सव कालावधी ची माहिती दर्शविणारा उपरोधिक टीका करणारा बॅनर लावत शिवसेनेच्या “ॲक्शन” ला भाजप कडूनही त्याच धर्तीवर “रिऍक्शन” देण्यात आली. सिंधुदुर्गात दोन दिवसापूर्वी दाखल झालेले केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जनआशीर्वाद यात्रेचा आज सिंधुदुर्गात समारोप झाला. आणि त्यानंतर सिंधुदुर्गातील राजकीय पडघम बॅनर च्या माध्यमातून वाजू लागले आहेत. नारायण राणे यांच्या यात्रेच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेकडून उद्धव ठाकरें यांचे इशारा देणारे लावले गेलेले बॅनर त्यानंतर देवगड मध्ये नारायण राणे व नितेश राणे यांचे फोटो वापरत ते असताना नाही संपवू शकले तर ते नसताना काय संपवणार असे सूचक टॅगलाईन चा शिवसेनेला इशारा देणारा नारायण राणे यांचा बॅनर लावण्यात आला. त्याला उत्तर देणारा “ते राज्यात मंत्री असताना कोकणात पराभूत केले, ते केंद्रात मंत्री होऊन काय फरक पडणार” असा बॅनर आज शिवसेनेकडून दुपारनंतर कणकवलीत मध्यवर्ती कार्यालयाकडे लावण्यात आला. ज्या विधानामुळे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर गुन्हा दाखल झाला व पुढचं नाट्य रंगल त्यानंतर भाजपा कार्यकर्त्यांनी संयम पाळला होता. पण जआशीर्वाद यात्रा संपताच पुन्हा एकदा भाजपाचे कार्यकर्ते आक्रमक होऊ लागले आहेत. भाजपा कार्यकर्त्यांच्या भाषेत सांगायचे झाल्यास ॲक्शन ला रिएक्शन देण्यास सुरुवात झाली आहे. आज रवीवारी सायंकाळी जन आशिर्वाद यात्रेचा समारोप झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांना उपरोधिक टोला लगावणारा बॅनर कणकवलीत लागला आहे. या बॅनर मध्ये 25 वर्ष रौप्यमहोत्सव, 50 वर्ष सुवर्ण महोत्सव, 60 वर्षे हिरक महोत्सव, 75 वर्ष अमृत महोत्सव, 100 वर्ष शतक महोत्सव असा उल्लेख करण्यात आला आहे. तर बॅनर च्या वरच्या बाजूला राणे यांचा इशारा दाखवणारा फोटोही लावण्यात आला आहे. तर बॅनर च्या खाली महाराष्ट्रात काहींना माहिती करिता जनहितार्थ असा उल्लेख करण्यात आला आहे. जन आशीर्वाद यात्रा संपल्यानंतर कणकवलीत भाजपाच्या कार्यकर्त्यांनी एक प्रकारे हा शिवसेनेला रिऍक्शन देण्याचा प्रयत्न केल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे आता कणकवलीत सुरू झालेले हे बॅनर युद्ध काय वळण घेते ते पाहणे महत्त्वाचे असणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here