आता चक्रीवादळाचा प्रवास गोव्याच्या दिशेने सुरु

0
86

 

सिंधुदुर्ग – जिल्ह्यासह गोव्यातील सासष्टी, सांगे आणि केपेसह इतर सर्व तालुक्यांना रात्रभर पावसाने झोडपले. ढगांचा गडगडाट आणि विजांचा लखलखाटाने कोकण किनारपट्टीवर चक्रीवादळाने येण्यापूर्वीच चांगलीच दहशत निर्माण केली आहे. दरम्यान रात्री गोव्यातील म्हापसे मध्ये एका माडाच्या झाडावर वीज पडल्याने हे झाड जळत होते. सिंधुदुर्गातही काही भागात जोरदार वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे झाडे उन्मळून पडली आहेत. दरम्यान गोव्याच्या समुद्र किनारी धोक्याचा लाल बावटा लावण्यात आला आहे.

वादळी वाऱ्यामुळे झाडे कोसळली, वीजही पडून नुकसान

गोव्यात व सिंधुदुर्ग जिल्यात शुक्रवारी रात्री उशीरापर्यंत अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडला. चक्रीवादळ राज्यात धडकणार असल्याच्या पार्श्वभूमीवर रात्री उशिरापर्यंत वादळी वारे सुरू होते. राज्यातील सासष्टी, सांगे आणि केपेसह इतर सर्व तालुक्यांना पावसाने झोडपले. आज शनिवारी देखील गोव्याच्या काही भागात पाऊस सुरु आहे. तर अन्य भागात ढगाळ वातावरण आहे. किनारी भागात जोरदार वारे वाहत आहेत. तर समुद्रालाही उधाण आले आहे. वादळी वर आणि पावसामुळे सिंधुदुर्गात काही ठिकाणी झाडे कोसळली. सावंतवाडी तालुक्यातील केसरी येथे झालेल्या वादळी वाऱ्यात तेथील विजेचे खांब आणि झाडे तुटून पडली आहेत.सुदैवाने कोणीही जखमी झालेले नाही. तर गोव्यातील म्हापसे येथे एका नारळाच्या झाडावर वीज पडून आग लागली आहे.

वादळाचा प्रवास गोवा सिंधुदुर्गच्या दिशेने

दरम्यान, मालदीव आणि लक्षद्वीप येथून सुटलेले हे वादळ आज शनिवारी गोवा आणि सिंधुदुर्गच्या किनाऱ्यावर धडकणार आहे. यादरम्यान, सुमारे 70 ते 80 कि.मी. प्रतितास वादळी वारे वाहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. हे वादळ राज्यात आर्थिक नुकसान करू शकते, असे हवामान खात्याने म्हटले आहे. लक्षद्वीप येथून हे वादळ काल शुक्रवारी गोव्याच्या दिशेने निघाले आहे. ते सकाळी केरळ येथील कन्नूर येथे धडकेल. तेथून ते अरबी समुद्रात कर्नाटक आणि पुढे गोवा व महाराष्ट्रातील किनाऱ्यावर धडकणार आहे. काल शुक्रवारी त्याचे पडसाद गोव्यात आणि सिंधुदुर्गात दिसायला सुरवात झाली. दरम्यान राज्यात ठिकठिकाणी पाऊस आणि वादळी वाऱ्यांसह विजेच्या कडकडाटाची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. सध्या या वादळाचा वेग 50 ते 60 कि.मी. प्रतितास इतका आहे, पण हा वेग गोव्याच्या किनारपट्टीवर वाढणार असी शक्यता हवामान विभागान वर्तविली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here