अखेर तीन तासांनंतर भाजपाचे चक्काजाम आंदोलन मागे

0
44

सिंधुदुर्ग – भाजपच्या वतीने बांदा-दोडामार्ग रस्त्यासाठी जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या नेतृत्वाखाली आज चक्काजाम आंदोलन सुरु करण्यात आले होते. प्रशासनाकडून जोपर्यंत लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत आंदोलन स्थगित करणार नसल्याचा इशारा राजन तेली यांनी दिला होता.

अखेर त्याची दखल प्रशासनाने घेतली आहे. ‘निविदा प्रक्रिया सुरू असून डिसेंबर महिन्यात रस्त्याच्या खडीकरण व डांबरीकरणाचे काम सुरू करण्यात येईल. तोपर्यंत पावसाळी डांबरीकरण करण्यात येईल, असे लेखी आश्वासन अधीक्षक अभियंता छाया नाईक यांनी दिल्याने भाजपने अखेर तब्बल तीन तासानंतर आंदोलन मागे घेतले.

परंतु तात्काळ कामास सुरुवात न केल्यास प्रखर आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी यावेळी दिला.

बांदा-दोडामार्ग रस्ताच्या दुरावस्थेबाबत प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज सकाळी भाजपने बांद्यात चक्काजाम आंदोलन केले. शाखा अभियंता विजय चव्हाण यांनी अधीक्षक अभियंता यांच्यावतीने लेखी आश्वासन दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here