९ कोटींच्या थकीत वीज बिल प्रकरणी वीज वितरण चे सहाय्यक अभियंता संतोष नलावडे निलंबित महावितरण अधीक्षक अभियंता विनोद पाटील यांची कारवाई

0
120

सिंधुदुर्ग – कणकवली तालुक्यात ९ कोटी ५६ लाखांची वीज देयकांची थकबाकी असल्याने सहाय्यक अभियंता संतोष नलावडे यांच्यावर महावितरण अधीक्षक अभियंता विनोद पाटील यांनी निलंबनाची कारवाई केली आहे.

तसेच आठवड्यातून दोन वेळा सावंतवाडी कार्यालयात हजेरी लावण्याचे आदेशही नलावडे यांना देण्यात आले आहेत.

गेली काही वर्ष महावितरण कंपनीचा तोटा वाढत चालला आहे. त्यात कोरोनाचा फटका बसल्यामुळे तोट्यात भर पडली आहे. अनेक वीज ग्राहकांनी आपली वीज देयके अदा केलेली नाहीत.

त्यामुळे महावितरणची मोठी अडचण झाली आहे. त्यामुळे ग्राहकांचा वीज प्रवाह खंडीत करण्याबरोबरच अधिकाऱ्यांवरही कारवाई करण्यात आली आहे.

कोकण परिमंडळा अंतर्गत येणाऱ्या कणकवली तालुक्यात ११ हजार ग्राहकांकडे मोठी थकबाकी आहे. त्यामुळे महावितरणचे अधीक्षक अभियंता विनोद पाटील यांनी कणकवली येथील सहाय्यक अभियंता संतोष नलावडे यांचे निलंबन केले आहे.

याबाबत कार्यकारी अभियंता बाळासाहेब मोहिते यांना विचारले असता त्यांनी नलावडे यांच्यावर कारवाई करण्यात आली असल्याचे सांगितले. तसेच ग्राहकांनी आपली थकबाकी वेळीच भरून अधिकाऱ्यांना सहकार्य करावे, असे आवाहन देखील केले.

वीज देयक थकबाकीमुळे एका अधिकाऱ्यावर खात्यांतर्गत कारवाई झाल्यामुळे वीज वितरण मध्ये खळबळ उडालेली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here