सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यातील सरपंचांना मिळणार विम्याचे कवच पालकमंत्री उदय सामंत यांची माहिती

0
111

 

सिंधुदुर्ग – कोरोनाच्या महामारीत गाव पातळीवर मुंबईतून येणाऱ्या चाकरमानी लोकांची व्यवस्था करण्यात गावचे सरपंच मुख्य भूमिका बजावत आहेत. सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यातील अशा सर्व सरपंचांना 5 लाखाचे विमा कवच देणार असल्याचे जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी सांगितले.

दोन्ही जिल्ह्यातील सरपंचांनी मुंबईकर चाकरमानी लोकांची गावच्या शाळेत, मंदिर,समाज मंदिरात रहायची व्यवस्था केली आहे. हे काम करत असताना कोविड योद्धा म्हणून कोणतीही भीती न बाळगता सरपंच आपलं काम सेवा भावी वृत्तीने पार पाडत आहेत. अशावेळी कोरोना बाधित रुग्णाच्या संपर्कात येऊन सरपंच कोरोना प्रभावित होण्याचा धोका जास्त आहे. याबाबत आपले विमा कंपन्याशी बोलणं झालं असून लवकरच पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी यांच्या माध्यमातून सरपंचांचा विमा फॉर्म भरून घेतला जाईल असे पालकमंत्री म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here