21 C
Panjim
Monday, January 24, 2022

सिंधुदुर्ग जिल्हय़ात ट्रूनॅट मशीनद्वारे कोरोना तपासणी

Latest Hub Encounter

 

सिंधुदुर्ग – जिल्हा रुग्णालयात ट्रुनॅट मशीनद्वारे कोवीड-19 ची तपासणी सुरू झाली आहे. आमदार वैभव नाईक, जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी मंगळवारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धनंजय चाकूरकर, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील, रेण्वीय निदान प्रयोगशाळेचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. उल्हास लोखंडे, डॉ. पी. एम. मोरे व तंत्रज्ञ परब यांच्या उपस्थितीत यंत्रसामुग्रीची पाहणी केली.

जिल्हा रुग्णालयात ट्रुनॅट मशीनद्वारे स्वॅब तपासणीची इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च, दिल्ली (आय. सी. एम. आर.) कडून परवानगी देण्यात आली आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये सध्या ट्रुनॅट एक मशीन व सीबी नॅट कोवीड-19 एक अशा दोन तपासणी मशीन उपलब्ध आहेत. या दोन्ही मशीनद्वारे एका तासात दोन तपासण्या होऊ शकतात. ट्रुनॅट मशीनद्वारे स्वॅब तपासल्यानंतर याची स्कॅनिंग टेस्ट होऊन निगेटिव्ह किंवा पॉझिटिव्ह स्वॅब रिपोर्ट मिळतो. निगेटिव्ह रिपोर्ट असेल, तर तो कन्फर्म रिपोर्ट असतो. पॉझिटिव्ह रिपोर्ट आला, तर हा रिपोर्ट कन्फर्म करण्यासाठी सीबी नॅट मशीन किंवा आर. टी. पी. सी. आर. मशीनमध्ये तपासणीसाठी पाठवणे आवश्यक असते. या दोन्ही मशीनद्वारे स्वॅब टेस्टिंग सुरू करण्यात आली आहे. तसेच त्या साठीचे प्रशिक्षण एन. आय. बी., पुणे यांच्याकडून देण्यात आली असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धनंजय चाकूरकर यांनी दिली.

याचवेळी जिल्हय़ातील बहुप्रतिक्षित माकडतापाचे (के. एफ. डी.) निदान करणारी प्रयोगशाळाही कार्यान्वित झाली आहे. यापूर्वी माकडताप नमुने तपासणीसाठी एन. आय. बी., पुणे किंवा मनिपाल रुग्णालय, गोवा यांच्याकडे पाठविण्यात येत होते. आता ही लॅब कार्यान्वित झाल्यामुळे हे नमुने स्थानिक पातळीवर तपासता येणार आहेत. तसेच या लॅबमध्ये लॅप्टोस्पारोसिस, डेंग्यू आणि चिकुनगुनिया या आजारांची तपासणी करता येणार आहे. यासाठी लागणाऱया मनुष्यबळाचे प्रशिक्षण एन. आय. बी., पुणेकडून झाले आहे. तसेच लागणाऱया इतर मशिन्स लवकरच प्राप्त होणार आहेत, अशी माहिती देण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

- Advertisement -