सिंधुदुर्ग जिल्ह्यात 493 व्यक्ती क्वॉरंटाइन, 45 नमुन्यांची अहवाल बाकी जिल्हा प्रशासनाने दिली माहिती

0
85

 

सिंधुदुर्ग – जिल्ह्यात आजमितीस 493 व्यक्ती अलगीकरणात असून त्यापैकी 344 व्यक्तींना गृह अलगीकरणात ठेवण्यात आले आहे. तर 149 व्यक्ती या संस्थात्मक अलगीकरणात आहेत. जिल्हा सामान्य रुग्णालयाने आजपर्यंत एकूण 524 नमुने तपासणीसाठी पाठविले असून त्यापैकी 478 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला आहे. अजून 45 नमुन्यांचा अहवाल येणे बाकी आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयातील विलगीकरण कक्षात सध्या 95 रुग्ण दाखल आहेत. त्यापैकी 57 रुग्ण हे डेडिकेटेड कोवीड हॉस्पिटलमध्ये तर 38 रुग्ण हे डेडिकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये दाखल आहेत. आरोग्य यंत्रणेमार्फत आज एकूण 1860 रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे. अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

जिल्ह्यातील 28 व्यक्ती कोरोना बाधीत युवतीच्या संपर्कात आल्या होत्या. या सर्व 28 व्यक्तींचा शोध घेऊन त्यांची अतीजोखमीच्या व कमी जोखमीच्या संपर्कांमध्ये विभागणी करण्यात आली आहे. त्यामधील 12 व्यक्ती या अतिजोखमीच्या संपर्कातील होत्या. तर 16 व्यक्ती या कमी जोखमीच्या संपर्कातील आहेत. कमी जोखमीच्या संपर्कातील सर्व व्यक्तींना गृह अलगीकरणात ठेवण्यात आले आहे. तर अतीजोखमीच्या सर्व 12 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. या सर्वांचे अहवाल प्राप्त झाले असून ते निगेटिव्ह आले आहेत.

त्या व्यक्तीच्या संपर्कातील 8 ही जण निगेटिव्ह

सावंतवाडी येथे गरोदर महिलेस गावी सोडण्यासाठी आलेली व्यक्ती कोल्हापूर येथे कोरोना बाधीत असल्याचे समोर आले. त्यानंतर या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या सर्व व्यक्तींचा शोध घेण्यात आला. त्यामध्ये जिल्ह्यताील 8 व्यक्ती कोल्हापूर येथे कोरोना बाधीत अढळलेल्या व्यक्तीच्या संपर्कात आल्या आहेत. या सर्वांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यांचा अहवाल प्राप्त झाला असून ते सर्वजणही निगेटिव्ह आले आहेत.

जिल्ह्यातील आजची स्थिती अशी आहे

1) घरीच अलगीकरण करण्यात आलेले 344

2) संस्थात्मक अलगीकरणात असलेले 149

3) पाठविण्यात आलेले एकूण नमुने 524

4) अहवाल प्राप्त झालेले नमुने 478

5 )आतापर्यंत पॉजिटीव्ह आलेले नमुने 2

6) निगेटीव्ह आलेले नमुने 476

7 )अहवाल प्राप्त न झालेले नमुने 45

8) विलगीकरण कक्षात दाखल रुग्ण 95

9) सध्यस्थितीत जिल्ह्यातील पॉजिटीव्ह रुग्ण 1

10) आज रोजी तपासणी करण्यात आलेल्या व्यक्ती 1860

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here