सिंधुदुर्ग जिल्ह्यात शासकीय मेडिकल कॉलेज जिल्हा रुग्णालयाच्याच आवारात होणार – आमदार वैभव नाईक

0
151

 

सिंधुदुर्ग – जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्याच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. या महाविद्यालयाबाबत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धनंजय चाकुरकर यांनी आरोग्य सेवा संचालक व सहसंचालक, उपसंचालक यांच्याकडे पुढील बाबींची पूर्तता करण्यासाठी मार्गदर्शन मागविल्याची माहिती आमदार वैभव नाईक यांनी दिली. जिल्हा रुग्णालयाच्या 27 एकर परिसरातच हे वैद्यकीय महाविद्यालय होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

जिल्हय़ात वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याबाबत सिंधुदुर्गात अस्तित्वात असलेल्या अनिवासी व निवासी इमारती, आवारातील मोकळी जागा, रुग्णालयातील विभाग व उपलब्ध यंत्रसामग्रीची पाहणी 27 सप्टेंबर 2016 रोजी अधिष्ठाता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, कोल्हापूर यांच्या अध्यक्षतेखाली द्विसदस्यीय समितीने केली होती. याबाबतचा अहवाल वैद्यकीय शिक्षण व संशोधन, मुंबई येथील संचालक यांच्याकडे सादर करण्यात आला होता. त्यानंतर जिल्हय़ात सुरू करण्यात आलेल्या आरटीपीसीआर लॅबच्या ऑनलाईन उद्घाटनप्रसंगी पालकमंत्री उदय सामंत यांनी जिल्हय़ातील वैद्यकीय महाविद्यालयाला तातडीने मंजुरी देण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली होती. मुख्यमंत्र्यांनी या कॉलेजला हिरवा कंदील दिल्यानंतर आता या मेडिकल कॉलेजच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. आरोग्य सेवा संचालनालयाच्या अधिपत्त्याखाली 300 खाटांचे जिल्हा रुग्णालय कार्यरत आहे. वैद्यकीय महाविद्यालयाकडे येथील इमारती, जागा, चल-अचल मालमत्ता, अधिकारी, कर्मचारीवर्ग यांचे हस्तांतरण करण्याबाबत जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाकडून करायच्या कार्यवाहीबाबत मार्गदर्शन करण्याची मागणी शल्य चिकित्सकांनी केल्याची माहिती आमदार नाईक यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here