सिंधुदुर्ग – जिल्ह्यात मुंबई-गोवा हा एकमेव राष्ट्रीय महामार्ग आहे. तालुक्यांना जोडणारे राज्य मार्ग आहेत. हे मार्ग जिल्हा परिषद अंतर्गत येत नाहीत; मात्र जिल्ह्यातील इतर जिल्हा मार्ग व ग्रामीण रस्ते जिल्हा परिषद अंतर्गत येतात. या दोन्ही प्रकारचे रस्ते मिळून ५ हजार ८९५ किलो मीटर लांबीचे २ हजार ८३० रस्ते जिल्हा परिषद अंतर्गत सध्या वापरात आहेत. जिल्ह्यात ४३२ ग्रामपंचायती आहेत. या ग्रामपंचायत क्षेत्रात अस्तित्वात असलेल्या रस्त्यांना ग्रामीण मार्ग म्हणतात. तालुक्यातील महत्त्वाच्या भागांना जोडणाऱ्या रस्त्यांना इतर जिल्हा मार्ग म्हणतात. अशाप्रकारे जिल्ह्यात एकूण ६९४.६० किलोमीटर लांबीचे ७९ रस्ते आहेत. ५ हजार २०१7 किलोमीटर लांबीचे २ हजार ७५१ ग्रामीण रस्ते आहेत. एवढ्या रस्त्याच्या माध्यमातून जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील दळणवळणाचा भार उचलला जात आहे. या मार्गांच्या देखभालीचा प्रश्न गंभीर बनत आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात रस्ते देखभालीचा प्रश्न बनतोय गंभीर
