सिंधुदुर्ग जिल्ह्यात आतापर्यंत 101 कोरोना रुग्ण बरे होऊन घरी परतले सध्या सक्रीय रुग्ण 50 वर

0
211

 

सिंधुदुर्ग – जिल्ह्यातील आणखी 3 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्या रुग्णांची संख्या 101 झाली आहे.

जिल्ह्यात मंगळवारी आणखी 2 व्यक्तींचा कोरोना चाचणी अहवाल पॉजिटीव्ह आला आहे. त्यामध्ये सावंतवाडी तालुक्यातील मळेवाड येथील एक आणि मालवण तालुक्यातील आडवली येथील एका व्यक्तीचा समावेश आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात 50 सक्रीय रुग्ण असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. चाकूरकर यांनी दिली.

जिल्ह्यात आतापर्यंत 3,056 नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी 2,980 नमुन्यांचे अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यातील 156 नमुने हे पॉजिटीव्ह आले आहेत. आतापर्यंत 2,824 नमुन्यांचा अहवाल निगेटीव्ह आला आहे. तर76 नमुन्यांचा अहवाल यायचा आहे. जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या 4 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 2 मे 2020 रोजी पासून आतापर्यंत जिल्ह्यात 99,501 व्यक्ती दाखल झाल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here