सिंधुदुर्ग जिल्ह्याची कोरोना रुग्णसंख्या 121 वर   

0
179

 

सिंधुदुर्ग – जिल्हा सामान्य रुग्णालयास आज प्राप्त झालेल्या अहवालामध्ये 3 पॉजिटीव्ह रुग्ण आलेले आहेत. पॉजिटीव्ह आलेल्या रुग्णांमध्ये 1 रुग्ण दोडामार्ग,1 रुग्ण कणकवली तर 1 रुग्ण देवगड तालुक्यातील आहे. सध्या जिल्ह्यात 121 रुग्णकोरोना बाधित रुग्ण आहेत.अशी माहिती जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांनी दिली.

जिल्हा रुग्णालयामार्फत एकूण 2 हजार 564 नमुनेतपासणीसाठी पाठविण्यात आले असून त्यापैकी 2 हजार 453 तपासणी अहवाल प्राप्त झालेआहेत. त्यातील 121 अहवाल पॉजिटीव्ह आले असून उर्वरीत 2 हजार 332 अहवाल निगेटीव्हआले आहेत. अजून 111 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झालेला नाही. जिल्हा सामान्य रुग्णालयातील विलगीकरण कक्षात सध्या 121 रुग्ण दाखल आहेत. त्यापैकी 76 रुग्णडेडिकेटेड कोवीड हॉस्पिटलमध्ये, 45 रुग्ण डेडिकेटेड कोवीड हेल्थ केअर सेंटरमध्ये दाखलआहेत. आरोग्य यंत्रणेमार्फत आज रोजी 5 हजार 833 व्यक्तींची तपासणी करण्यात आलीआहे. जिल्ह्यातील एकूण 121 कोरोना बाधीत रुग्णांपैकी 17रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. तर दोन रुग्णाचा मृत्यू झाला आहे. एक रुग्णउपचारासाठी मुंबई येथे गेला आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात 101 रुग्णांवर उपचार सुरूआहेत. परराज्यातून वमहाराष्ट्र राज्याच्या अन्य जिल्ह्यातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात दि.  2 मे 2020 पासून आज अखेर एकूण 77 हजार 278व्यक्ती दाखल झाल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here