सिंधुदुर्ग – सह्याद्रीच्या कुशीत किती वाघांचा संचार आहे, हे आता काही दिवसातच स्पष्ट होणार आहे. त्यासाठी वनविभागाकडुन आज पासून “व्याघ्र गणना” करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. दरम्यान २१ जानेवारी पर्यंत ही गणना केली जाणार आहे. त्यासाठी ५१७ बीटची नियुक्ती करण्यात आली आहे. तर चार वर्षानंतर ही गणना होत आहे. याबाबतची माहीती सावंतवाडीचे उपवनसंरक्षक शहाजी नारनवर यांनी दिली.
सह्याद्रीच्या पट्ट्यात हल्लीच वाघाचे अस्तित्व असल्याचे समोर आले होते. वनविभागाच्या माध्यमातून लावण्यात आलेल्या कॅमेऱ्यात वाघ ट्रॅप झाला होता. त्यामुळे या ठिकाणी वाघ आहे की नाही, या चर्चेला पुर्णविराम मिळाला होता. दरम्यान आज पासून सुरु होणार्या व्याघ्र गणनेच्या माध्यमातून आता वाघाचे अस्तित्व समोर येणार आहे. यासाठी एकुण पाच जिल्ह्यात ही गणना केली जाणार असून कोेल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग अशा ठिकाणी ही गणना केली जाणार आहे.