सिंधुदुर्ग – जिल्ह्यात शुक्रवारी ६६ ग्राम पंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. ४९४ सदस्य पदासाठी चुरसीचे सुमारे ७२.१२ टक्के मतदान झाले. सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली. जिल्ह्यात १०८७ उमेदवारांचे भवितव्य मतपेटित बंद झाले आहे. आता १८ रोजी मतमोजणी नंतर जाहिर होणाऱ्या निकालाकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
कणकवली तालुक्यात ७८.३१ टक्के मतदान
कणकवली तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीसाठी ७८.३१ टक्के मतदान झाले.तोंडवली – बावशीत ८० .८२ टक्के तर भिरवंडेत ७४.८६ टक्के मतदान झाले आहे. तोंडवली – बावशी आणि भिरवंडे ग्रामपंचायत साठी ७ मतदानकेंद्रांवर २ हजार १०७ मतदारांपैकी एकूण १ हजार ६५० मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. गांधीनगर ग्रा. पं. च्या ७ ही जागा यापूर्वीच बिनविरोध निवडून आल्या आहेत.
सावंतवाडी तालुक्यात ७३ टक्के मतदान
सावंतवाडी तालुक्यात ७३ टक्के मतदान झाले. यामध्ये ग्रामपंचायत निहाय कोलगाव ७९.०६ टक्के,मळगाव ६८.१९ टक्के,आंबोली ६८.३३ टक्के, चौकुळ ६६.५३ टक्के,तळवडे ७६.३४ टक्के,मळेवाड ७७.३९ टक्के,दांडेली ७७.६८ टक्के,आरोस ८८.२८ टक्के,इन्सुली ७८.३१ टक्के,डिंगणे ७७.०३ टक्के,आरोंदा ६६.७९ टक्के,असे एकूण ७३.७९ टक्के मतदान झाले आहे.
दोडामार्गमध्ये ६८ टक्के मतदान
दोडामार्ग तालुक्यात आज हेवाळे,तेरवण-मेढे आणि कुडासे या तीन ग्रामपंचायतीसाठी ६८ टक्के मतदान झाले. या मतदानाच्या वेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
मालवण तालुक्यात ६८ टक्के मतदान
मालवण तालुक्यातील सहा ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी ६८ टक्के मतदान झाले आहे. ५४ जागांसाठीच्या उभ्या असलेल्या १०९ उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले आहे.
वैभववाडी तालुक्यात ६९.३८ टक्के मतदान
वैभववाडी तालुक्यातील १२ ग्रामपंचायतींसाठी सरासरी ६९ टक्के मतदान झाले आहे. १२ ग्रामपंचायतीतील ७० जागांसाठी १४६ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत. यातील मांगवली ग्रामपंचायत या आधीच बिनविरोध झाल्यामुळे १२ ग्रामपंचायतींसाठी मतदान प्रक्रीया पार पडली.यामध्ये ऐनारी, भुईबावडा, मांगवली, वेंगसर, सोनाळी, एडगाव, कोकिसरे, नाधवडे, कुंभवडे, खांबाळे, आचिर्णे, लोरे, सांगुळवाडी या ग्रामपंचायतीसाठी मतदान झाले.
कुडाळ तालुक्यातील नऊ ग्रामपंचायतीसाठी ७१.४४ टक्के मतदान
कुडाळ तालुक्यातील नऊ ग्रामपंचायतीसाठी सुमारे इतके ७१.४४ टक्के मतदान झाले. कुपवडे प्रभाग क्रमांक १ येथील ईव्हीएम मशीन बंद पडल्याची घटना घडली मात्र तात्काळ या ठिकाणी दुसरी मशीन दिल्यानंतर मतदान प्रक्रिया पुन्हा सुरू झाली. तालुक्यातील माड्याची वाडी, कुपवडे, वाडोस, गोठोस, वसोली, पोखरण, आकेरी, गिरगाव , गोवेरी या नऊ ग्रामपंचायतीसाठी मतदान झाले.