27.9 C
Panjim
Monday, October 3, 2022

सिंधुदुर्गात माणगाव मध्ये दोन माणसांनी अडवला 300 लोकांचा रस्ता ग्रामपंचायतीलाही जुमानत नाहीत ही माणसं

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

 

सिंधुदुर्ग – “गाव करी ते राव काय करी” अशी तळकोकणात म्हण आहे. मात्र कोकणी माणसानेच या म्हणीला फाटा दिला आहे. त्याच काय झालं सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातल्या माणगाव गावातीला धरण वाढीमधल्या तब्बल २० घरांचा गावातील २ माणसांनी रस्ता बंद केला आहे. याबाबत आक्रमक झालेल्या ग्रामस्थांनी थेट ग्रामपंचायतीसमोर उपोषणाचा इशारा दिला आहे. धरण वाडीत ३०० लोकवस्ती आहे. येथील मंदिरात एकत्र येत आता या लोकांनी थेट संघर्षाचा निश्चय केला आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील माणगाव हे जिल्ह्यातल्या सहकाराच्या क्रांतीतील एक महत्वाचे गाव म्हणून ओळखले जाते. जिल्ह्यातील कृषी प्रधान गाव म्हणूनही माणगावची ओळख आहे. मात्र याच गावात एकीतून उभ्या राहिलेल्या सहकाराच्या क्रांतीला फाटा देणारी घटना घडली आहे. गावातील धरण वाढीत जाणारा रस्ता येथीलच दोन ग्रामस्थांनी अढवला आहे. विशेष म्हणजे हा मार्ग ग्रामपंचायतीच्या दप्तरी नोंद आहे. त्यावर ग्रामपंचायतीने मार्ग बांधणीसाठी लाखो रुपयांचा निधी खर्च केला आहे. मात्र १२ फूट रुंदीचा हा मार्ग वाढीत पोचण्याच्या आतच येथील २ ग्रामस्थांनी दोन्ही बाजूला या मार्गावर अतिक्रमण केले आहे. एका बाजूने मार्ग खोदला आहे तर दुसऱ्या बाजूने घराच्या अंगणाला मार्गावरच पायऱ्या बांधल्या आहेत. अंगणाचं छप्पर थेट मार्गावरच आले असल्याने मोठे वाहनही पुढे जाऊ शकत नाही अशी स्थिती आहे. या ठिकाणी १२ फुटाच्या रुंदीच्या जागी केवळ ५ फुटाहून कमी मार्ग उरला आहे. दोन व्यक्तीची ही दहशत गावलाच नाही तर ग्रामपंचायत सत्ताधारी आणि प्रशासनालाही भारी पडत आहे.

राजकीय दबावामुळे कुठचीही कारवाई होत नाही

यावेळी बोलताना पांडुरंग वारंग म्हणाले कि या मार्गाच्या बाबतीत राजकीय दबाव असल्याने मार्गाची स्थिती वाईट आहे. हा मार्ग १९५८ साली ग्रामपंचायतीत नोंद झालेला रस्ता आहे. येथील २ नागरिकांनी एवढ अतिक्रमण केलेलं आहे कि त्या ठिकाणी रस्ता ५ फुटाचा झालेला आहे. त्यांनी सरकारी मालमत्तेवर अतिक्रमण केलेले आहे. त्यामुळे आमच्या वाडीपर्यंत साधं वाहन येऊ शकत नाही. माझे वडील आता आजारी असतात त्यांना कधीही डॉक्टर कडे जावं लागत अशावेळी स्थानिकांची मदत नसती तर माझे वडील आज नसते, हे सत्य आहे असे ते यावेळी म्हणाले.

जिल्हा परिषदेसमोर उपोषणाचा इशारा.

यावेळी बोलताना राघो धोंडी धुरी म्हणाले, या बाबत आम्ही ग्रामपंचायतीसमोर उपोषण केले. ग्रामपंचायतीने आमच्या मागण्यांना होकार दिला. त्यानंतर आम्ही धरण वाडीत जाणार हा. मार्ग होण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले.जिल्हा परिषदेने याकडे दुर्लक्ष केला आहे. संबंधित अधिकाऱ्यांच्या चौकशीचे आदेशही देण्यात आले आहेत. यापूर्वी आम्ही ग्रामपंचायतीसमोर उपोषण केले मात्र त्यामुळे कोणताही बदल झालेलं दिसला नाही. असेही ते म्हणाले.

पोलीस बंदोबस्थात केलं होत मार्गाच काम

यावेळी बोलताना अनिल विठ्ठल वारंग म्हणाले. वादग्रस्त जागेच्या ठिकाणी रस्त्याची बांधणी मी स्वतः केली आहे. ग्रामपंचायतीकडून हे काम कोणी घेत नव्हतं म्हणून मी घेतले. माझ्याकडे आजही त्याची वर्क ऑर्डर आहे. हा मार्ग ९८४ फूट लांब आणि १२ फूट रुंदीचा होता. या मार्गाचं काम कोणीही करत नव्हतं. मात्र ग्रामपंचायतीने घटनास्थळी पोलीस कुमक पाठवली. त्यांच्या उपस्थितीत काम पूर्ण केलं. आता त्यानंतर मार्गाचं लाखो रुपये खर्च केलेलं हे काम तोडण्यात आलं. गावातील दोनच मानस अशाप्रकारे गावाला वेठीस धरत असल्याचे ते म्हणाले.

रस्ता असून जावं लागत चालत

यावेळी बोलताना मोहिनी मोहन धुरी म्हणाल्या, सर्वच समस्येला सामोरे जाव लागत. रस्ता असून चालत जावं लागत. गरोदर बाई असेल तर तिला चालतच मुख्य मार्गापर्यंत जावं लागत. माझे मिस्टर आजारी आहेत त्यांना डॉक्टर उपचारासाठी न्यायचं असेल तर चालतच जावं लागत. गावातील दोघांनी मार्ग अडवल्याने आम्हाला पायपीट करावी लागत असल्याचे त्या म्हणाल्या.

दरम्यान माणगाव धरण वाडीतील दोन माणसांनी येथील लोकांचा रस्ता अढवला आहे. त्यामुळे शासन दरबारी सातत्याने विनंती करणारे हे लोक आता न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत. त्यांना हवाय त्यांच्या हक्काचा मार्ग. मात्र सध्या तो सर्व गावाला वेठीस धरत दोन माणसांनी अडवला आहे.

triumph-high school-ad

Latest On Hub Encounter

YouTube player

Latest on Passay

YouTube player

Latest on Unsung Hero

YouTube player

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img