सिंधुदुर्गात जोरदार गारपीट,बागायतदारांचे नुकसान, शेतकऱ्यांची पचनाम्याची मागणी

0
164

 

सिंधुदुर्ग जिल्ह्यात अवकाळी पावसाने शनिवारी सायंकाळी जोरदार हजेरी लावली. सुमारे अर्धा तास झालेल्या पावसात मोठ्या प्रमाणात गारपीट झाली. यामुळे आंबा काजू पिकाचे मोठे नुकसान झाले आहे.

कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी संचार बंदीमुळे आंबा पीक उत्पादन होऊन सुद्धा मार्केटमध्ये कोट्यावधी रुपयाचा आंबा पडलेला आहे. तसेच काजू पीक बी उचलत नसल्यामुळे दर पडलेले आहेत. तसेच गारपीटीमुळे मोठ्या प्रमाणात आंब्याची घळ झालेली आहे. केळीबाग आदींचे देखील जिल्ह्यात ठिकठिकाणी नुकसान झाले.त्यामुळे शेतकऱ्यांकडून नुकसानभरपाईची मागणी केली जात आहे. प्रशासनाने तातडीने पंचनामे करावेत,अशी मागणी शेतकऱ्यांमधून केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here