सांगली येथून गणपतीपुळे येथे पर्यटनासाठी मैत्रिणींबरोबर आलेली विवाहित महिला बेपत्ता,गूढ कायम पोलीस तपास सुरू

0
272

 

रत्नागिरी – जिल्ह्यातील गणपतीपुळे तीर्थक्षेत्रात रविवारी सांगली वरून आलेल्या ५७ वर्षीय महिला गायब झाल्याने गणपतीपुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या महिला काहींनी समुद्रातून वरती येताना पाहिली असून ही या महिलेची शोध मोहीम पोलिसांकडून सुरू आहे मात्र अद्याप कोणत्याही तपास न लागल्याने या महिलेच्या बेपत्ता होण्याचे गूढ वाढले आहे. या प्रकरणी या महिलेच्या पतीने गणपतीपुळे पोलीस ठाण्यात पत्नी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली आहे. सौ.सुनीता रामचंद्र पाटील उर्फ निकिता असं या बेपत्ता महिलेचे नाव आहे.

कोल्हापूर सांगली परिसरातून काही महिला गणपतीपुळे येथील पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी आल्या होत्या त्यावेळी हा सगळा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गणपतीपुळे येथे देवदर्शन झाल्यानंतर त्या महिला गणपतीपुळे समुद्रामध्ये समुद्रस्नान करण्यास गेल्या होत्या. समुद्रस्नान चालू असताना सुनीता या अचानक गायब झाल्याने त्यांच्याबरोबर असणाऱ्या महिलांमध्ये घबराट उडाली. सुनीता यांच्या सोबत आलेल्या महिलांनी त्यांच्या राहत्या घरी संपर्क करून त्यांच्या पतीला या सगळ्या प्रकारची माहिती दिली. यानंतर त्यांचे पती गणपतीपुळे येथे दाखल झाले.

श्री. रामचंद्र आबा पाटील यांनी आपली पत्नी गणपतीपुळे समुद्रावरून गायब झाल्याची तक्रार पोलीस ठाण्यात नोंदवली असून सदरची महिला ही गणपतीपुळे समुद्रामध्ये आपल्या मैत्रिणींसह समुद्र स्नान करत असताना अचानक गायब झाल्याने त्यांच्या मैत्रिणीने इकडे तिकडे शोधा शोध सुरू केली. पण सुनीता या कोठेही आढळून न आल्याने त्यांनी संबंधित नातेवाईकांकडे फोन करून सदरच्या घटनेची माहिती दिली. त्यानंतर रामचंद्र आबा पाटील यांनी गणपतीपुळे पोलीस स्थानकामध्ये आपली पत्नी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली आहे. दरम्यान रामचंद्र पाटील यांनी केलेला हा दुसरा विवाह असल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे.

रत्नागिरी ग्रामीण मधील जयगड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कुलदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गणपतीपुळे पोलीस स्थानकाच्या पोलीस उपनिरीक्षक क्रांती पाटील या आपले सहकारी सहाय्यक पोलीस फौजदार संदीप साळवी, पोलीस नाईक जयेश कीर, पोलीस कॉन्स्टेबल निलेश गुरव आदी तपास करत आहेत. मात्र अद्याप या बेपत्ता महिलेचा शोध लागलेला या प्रकरणाचे गूढ वाढले असून पोलीस युद्धपातळीवर तपास करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here