सिंधुदुर्ग – सचिन वाझे आणि परमवीर सिंग प्रकरणावरून भाजपचे आमदार नितेश राणे हे आक्रमक झाले आहेत.त्यांनी या प्रकरणावरून उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधत तेच यांचे गॉडफादर असल्याचा आरोप करत त्यांच्या चौकशी सह राजीनाम्याची मागणी केली आहे.
वाझेंची मर्सिडीज संजय राऊत यांच्या भावाच्या कार्यालया बाहेर
नितेश राणे यांनी यावेळी संजय राऊत यांच्यावर ही निशाणा साधत सचिन वाझेंची मर्सिडीज संजय राऊत यांच्या भावाच्या कार्यालया बाहेर काय करत होती याच उत्तर संजय राऊत यांनी द्यावं अस सांगून त्यांचा हमाम वेगळा आहे आणि आमचा हमाम वेगळा आहे असं विधान केलं आहे.नितेश राणे यांनी कणकवली मध्ये पत्रकारांशी बोलताना हे आरोप केले आहेत.
वरून देसाई यांचे मी नाव घेतले आहे
सचिन वाझे प्रकरणात वरून देसाई यांचे मी नाव घेतले आहे. आता सचिन वाझे यांची मर्सिडीज कुठे होती. हे देखील मी सांगितले आहे. सरकारने त्याबाबत काय भूमिका घेतली आहे. हे त्यांनी स्पष्ट करावे. मुळामध्ये संजय राऊत यांच्या आमदार असलेल्या भावाच्या कार्यालयाबाहेर ती मर्सिडीज काय करत होती. याचे उत्तर संजय राऊत यांनी द्यावे. असेही आमदार नितेश राणे यावेळी म्हणाले.
सचिन वाझे आणि परमबीर सिंग ही प्यादी आहेत
सचिन वाझे आणि परमबीर सिंग ही प्यादी आहेत. त्यांचा गॉड फादर वेगळा आहे. या घटनेचा सूत्रधार काही वेगळा आहे. याच सचिन वाझेंसाठी सेना भाजपचे सरकार असताना उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर दबाव आणला होता. त्यानंतर आता विधानसभेत एका प्रश्नावर बोलताना सचिन वाझे हा काही ओसमा बिन लादेन आहे का ?असे विधान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. त्यामुळे वाजे यांचा गॉडफादर कोण हे लक्षात आलेले आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेच सचिन वाझे यांची वकिली करत होते
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेच सचिन वाझे यांची वकिली करत होते. त्यांची वकिली करण्यामागचे कारण काय ?/याचे उत्तर त्यांनी दिले पाहिजे. एन आय ए कडे या प्रकरणाची संपूर्ण माहिती आहे. त्यामुळे अनेकांची नावे समोर येतील आणि आता सूत्रधारही समोर येईल. सचिन वाझे यांनी हा सगळा कट पब्लिसिटीसाठी केला की अन्य कुणाच्या पब्लिसिटीसाठी केला ते लवकरच समोर येईल. असेही यावेळी आमदार नितेश राणे म्हणाले.