संख्या बहिणीवर भावाचा बलात्कार, दोन वेगळ्या घटनांनी महाराष्ट्र हादरला

0
109

स्वतःच्या सख्ख्या बहिणीवर भावाने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना महाराष्ट्रातील अमरावती आणि पनवेल मध्ये उघडकीस आली आहे. अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यातील दारापूर येथे ही घटना घडली. तर दुसरी घटना रायगड जिल्ह्यातील पनवेल मधील आहे. दोन्ही प्रकरणात पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.

अमरावतीच्या घटनेत पीडित बहिणीचे लग्न झाल्यानंतर काही कारणाने ती माहेरी राहत होती. घरी कुणी नसताना संधी साधत नात्याला काळिमा फासण्याचा प्रकार नराधाम भावाने केला. पीडितेने याप्रकरणी पोलिसांत तक्रात दिली. त्यावरुन पोलिसांनी आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

तर पनवेलमध्ये बलात्कारी भावावर खांदेश्वर पोलिसांनी पॉक्सो, लैंगिक अत्याचार प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. अल्पवयीन (16 वर्षीय) मुलीच्या पोटात दुखू लागल्याने कुटुंबीयांनी तिला कामा रुग्णालयात दाखल केले होते. तेथे ती गर्भवती असल्याचे लक्षात येताच याबाबत तिच्या आई वडिलांनी विचारपूस केली. त्यावेळी तिच्या सख्ख्या भावानेच तिच्यावर बलात्कार केल्याचे तिने सांगितले. दोघेही भाऊ-बहीण हे महाविद्यालयीन शिक्षण घेत होते. ऑगस्ट महिन्यात पीडित मुलगी मध्यरात्रीच्या सुमारास झोपलेली असताना तिच्या भावाने जबरदस्तीने तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचे उघड झाले.लैंगिक अत्याचार करणारा आपला सख्खा मोठा भाऊच असल्याने पीडित मुलीने घाबरून तसेच बदनामीच्या भीतीने सदर प्रकाराची माहिती कुणालाच दिली नाही. मुलीच्या आई-वडिलांना मोठा धक्का बसला असून, त्यांनी जबाब नोंदवून आरोपी मुलावर गुन्हा दाखल केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here