शिवसेनेला विनाशकाले विपरीत बुद्धी – सुधीर मुनगुंटीवार

0
127

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना नेते संजय राऊत यांच्यातील कलगीतुऱ्यामध्ये आता भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी उडी घेतली आहे. आमच्यासाठी सर्व पर्याय खुले असल्याची शिवसेनेने घेतलेली भूमिका म्हणजे विनाशकाले विपरीत बुद्धी आहे, अशी खोचक टीका मुनगंटीवार यांनी केली आहे. मुनगंटीवार यांच्या या विधानामुळे शिवसेना- भाजपात आणखीनच दरी निर्माण होण्याची शक्यता आहे.

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजप युती धर्माचं पालन करत नसेल तर आमच्यासमोर सर्व पर्याय खुले असल्याचं वक्तव्य केलं होतं. त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना सुधीर मुनगंटीवार यांनी शिवसेनेला घेरले आहे. शिवसेनेला जसे सर्व पर्याय खुले आहेत, तसेच भाजपलाही पर्याय खुले आहेत. पण ‘रघुकुलरीत सदा चली आई’ या म्हणीनुसार जर आपण महायुती केली आहे. तर महायुतीच्या सोबतच राहिलं पाहिजे, असा सल्ला मुनगंटीवार यांनी शिवसेनेला दिला. जसे अनेक हात शिवसेनेकडे येत आहेत. तसेच अनेक लोक भाजपला समर्थन करण्यासाठी पुढे येत आहेत. असेही ते म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here