महाराष्ट्रात आदिवासीबहुल अहेरीत सर्वाधिक ‘नोटा’चा वापर

0
128

विदर्भातील शहरी भागात वाढीव आरक्षणाला विरोध करण्यासाठी ‘सेव्ह मेरिट सेव्ह नेशन’ आंदोलन उभारण्यात आले. या आंदोलकांनी ‘नोटा’चा वापर करण्याचे आवाहन केले होते. त्याचा परिणाम शहरी भागात जाणवला. मात्र, आदिवासीबहुल, अनुसूचित जाती, ओबीसी मतदार अधिक असलेल्या मतदारसंघातही ‘नोटा’चा वापर मोठय़ा प्रमाणात झाल्याचे दिसून येते. गडचिरोली जिल्ह्य़ातील अहेरी, आरमोरी येथे नक्षलवाद्यांच्या प्रभावामुळे नोटांचा वापर झाल्याचे सांगण्यात येते. अहेरीत ५ हजार ७६५ आणि आरमोरी येथे ३ हजार ६५० नोटाला  मतदान झाले. मेळघाट, वर्धा आणि अकोला पश्चिममध्ये मोठय़ा प्रमाणात नोटा पर्याय मतदारांनी निवडला.  महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात जिल्ह्य़ात दुसऱ्या क्रमांकाचे कमी मतदान झाले. शिवाय ३ हजार ६४ नागरिकांनी नोटाला मतदान केले.

# विदर्भातील काही मतदारसंघात नोटाला पडलेली मते
अहेरी- ५७६५

आरमोरी-       ३६५०

पश्चिम नागपूर-  ३७१७

पूर्व नागपूर-     ३४६०

दक्षिण-पश्चिम- ३०६४

मेळघाट- २८३५

वर्धा-   २७२९

अकोला वेस्ट-   २६१७

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here