सिंधुदुर्ग – जिल्ह्यातील हुमरस येथील महिलेचा विनयभंग करणाऱ्या शिवसेनेच्या सरपंचाचा महाराष्ट नवनिर्माण सेनेतर्फे निषेध करण्यात आला आहे . सत्ताधारी शिवसेनेच्या सरपंचाला ग्रामस्थांनी निवडून दिले .परंतु त्याने त्याच गावातील एका महिलेचा विनयभंग करुन लोकप्रतिनिधी पदाला काळीमा फासला असल्याची टीका मनसेचे प्रदेश सरचिटणीस माजी आमदार परशुराम उपरकर यांनी केली आहे. ते कणकवली येथे बोलत होते. सत्ताधारी पक्षाचे सरपंच म्हणून जरी त्यांना अटक झालेली नसली तरी हे सत्ताधारी पक्षाचे लोकप्रतिनिधी कशाप्रकारे जनतेशी वागतात याचे उत्तम उदाहरण आहे. संबंधित महिला हि शिवसेनेची कार्यकर्ती आहे, त्यामुळे शिवसेना आता त्या महिलेला न्याय देणार की , सरपंचाला न्याय देणार ? असा सवाल परशुराम उपरकर यांनी केला आहे.
शिवसेनेच्या हुमरस सरपंचाचा मनसेतर्फे कणकवलीत निषेध, महिलेचा विनयभंग केल्याचा आहे आरोप
