शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रुग्णसेवेचे योग्य नियोजन करा – आ. वैभव नाईक

0
157

 

सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून अनेक रुग्णांना विविध कारणे देऊन खाजगी रुग्णालयात पाठविले जात आहेत. दोन दोन दिवस रुग्णांवर उपचार केले जात नाही. डॉक्टर उपलब्ध नसतात अशा तक्रारी नागरीकांकडून येत असल्याने आज आमदार वैभव नाईक यांनी सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठता डॉ. प्रकाश गुरव यांच्यासमवेत बैठक घेत संबंधित तक्रारींची विचारणा केली. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागरगोजे यांनाही बैठकीला बोलवण्यात आले.व रुग्णसेवेबाबत आवश्यक सूचना आ. वैभव नाईक यांनी दोन्ही अधिकाऱ्यांना दिल्या.
बैठकी दरम्यान अधिष्ठता व जिल्हा शल्य चिकित्सक या दोन्ही अधिकाऱ्यांमध्ये समन्वय नसल्याचे निदर्शनास आल्याने आ. वैभव नाईक यांनी त्यांना समज देत तत्कालीन मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी हे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरु केले आहे. येथे येणाऱ्या सर्व रुग्णांना चांगली सेवा मिळालीच पाहिजे. उपलब्ध डॉक्टरांचे योग्य वेळापत्रक बनवून त्याचा फलक लावून रुग्णांना चांगली सेवा द्यायला लावा जे डॉक्टर ऐकत नसतील त्यांना घरी पाठवा. दोन्ही अधिकाऱ्यांनी आपले पीआरओ नेमून लोकप्रतिनिधींना त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर द्या. व पुढील आठवड्यात डॉक्टरांची बैठक लावा अशा सक्त सूचना आ.वैभव नाईक यांनी दिल्या. आठ दिवसात यावर आवश्यक कार्यवाही करून पुढील आठवड्यात डॉक्टरांची बैठक लावण्याची ग्वाही अधिष्ठता डॉ. प्रकाश गुरव यांनी दिली.
यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख संजय पडते, महिला जिल्हाप्रमुख जान्हवी सावंत, उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, कुडाळ तालुकाप्रमुख राजन नाईक,तालुका संघटक बबन बोभाटे, युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट,शहर प्रमुख संतोष शिरसाट,ओबीसी सेल जिल्हाप्रमुख रुपेश पावसकर, उपतालुकाप्रमुख कृष्णा धुरी, उपतालुकाप्रमुख बाळा कोरगावकर,उपतालुकाप्रमुख सचिन कदम, एसटी कामगार सेना जिल्हाध्यक्ष अनुप नाईक, माजी उपसभापती जयभारत पालव, डिगस सरपंच पूनम पवार,अतुल बंगे,राजू कविटकर, युवासेना तालुकाप्रमुख योगेश धुरी,सुशील चिंदरकर,शेखर गावडे,सोशल मीडिया जिल्हाप्रमुख अनुराग सावंत, संदीप म्हाडेश्वर,दीपक आंगणे, नागेश ओरोसकर, छोटू पारकर, मनीष पारकर,बाळा कांदळकर,बाळू पालव, नगरसेवक उदय मांजरेकर, सुनील जाधव, अवधूत मालणकर,रुपेश आमडोस्कर, सचिन आचरेकर,विकास राऊळ, आबा मुंज,पप्पू म्हाडेश्वर, सागर भोगटे,गंगाराम सडवेलकर,नगरसेविका श्रेया गवंडे,नगरसेविका ज्योती जळवी,मृणाल परब, तळगाव सरपंच लता खोत, दर्शना म्हसकर, मंगला ओरोसकर,ममता वेंगुर्लेकर,साक्षी सावंत, राजश्री पवार,स्नेहा चव्हाण,मंदार खोटावळे, बाळू सावंत, बाळा पवार,अविनाश पाटकर, प्रताप साईल,महेश परब, हरी वायंगणकर, नरेंद्र राणे, रवी कदम, प्रदीप गावडे, पिंट्या गावडे, नागेश करलकर, आणा भोगले, नितीन राऊळ, बाबी गुरव, गोट्या चव्हाण आदींसह शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक, महिला शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here