सिंधुदुर्ग – कणकवली विधानसभा मतदार संघातील शाळांमध्ये अखंडीत विज रहावी,तसेच त्या ठिकाणी शिक्षण घेणार्या मुलांना त्याचा फायदा व्हावा, यासाठी आमदार नितेश राणे हे आता आपल्या मतदार संघातील शाळांवर सोलर पॅनल बसविणार आहेत. तसा आपला संकल्प असल्याचे त्यांनी आज व्टिटरच्या माध्यमातून जाहीर केले आहे. दरम्यान त्यांच्या या निर्णयामुळे शाळांना मोठ्या प्रमाणात येणारी बिले कमी होण्यास मदत होणार आहे. त्याच बरोबर अखंडीत विज मिळाल्यामुळे त्याचा फायदा विद्यार्थ्याना होणार आहे. असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. आपल्या ट्विट मध्ये आमदार राणे म्हणतात २०० शाळांमध्ये डिजिटल क्लासरूम केल्यानंतर आता आपण शाळांवर सोलर पॅनल बसवणार आहोत. यासाठी csr फंड मिळविण्यासंदर्भात चर्चा चालू आहे.
शाळांच्या विजेचा प्रश्न सोडविण्यासाठी कणकवली विधानसभा मतदार संघातील शाळांमध्ये सोलर पॅनल बसविण्याचा आमदार नितेश राणे यांचा संकल्प
