28.1 C
Panjim
Saturday, April 1, 2023

राज्यात प्रथमच रत्नागिरी इनोव्हेशन डिस्ट्रिक्ट म्हणून जाहीर, उदय सामंतांची माहिती

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

 

सिंधुदुर्ग – जिल्ह्यातील तरुणांना नोकरीची संधी उपलब्ध व्हावी, प्रदूषणविरहीत प्रकल्पाच्या माध्यमातून औद्योगिक विकासाला चालना मिळण्यासाठी रत्नागिरी जिल्हा इनोव्हेशन डिस्ट्रिक्ट म्हणजेच नवप्रवर्तन जिल्हा म्हणून जाहीर करण्यात आला आहे. उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. पुढील चार महिन्यात जिल्ह्याचा विस्तृत प्रकल्प अहवाल (डीपीआर) केला जाईल, अशी माहिती राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी ऑनलाइन पत्रकार परिषदेत दिली.

सामंत म्हणाले, नवप्रवर्तन योजनेची अंमलबजावणी केवळ परदेशात झाली आहे. महाराष्ट्रात प्रथमच ही योजना राबविली जात आहे. यासाठी उद्योग मंत्रालयाबरोबरच उच्च व तंत्रशिक्षण विभाग, पर्यटन खाते हे एकत्रितरित्या काम करणार आहेत. स्थानिक जनतेने सकारात्मक दृष्टीकोन ठेवून या प्रकल्पांना पाठिंबा देण्याची आवश्यकता असून जिल्ह्याच्या औद्योगिक क्रांतीचे नवे पाऊल महाविकास आघाडीच्या सरकारने टाकले आहे. यामाध्यमातून एक लाख नोकऱ्यांसह उद्योग रिसर्च सेंटर, आंतरराष्ट्रीय दर्जाचे संशोधन विद्यापीठ, शाळा जिल्ह्यात उभारण्यात येणार असल्याची माहितीही उदय सामंत यांनी यावेळी दिली.रत्नागिरी जिल्हा निसर्ग साैंदर्याने नटलेला आहे. येथे प्रदूषणविरहीत कारखाने आणण्यासाठी राज्य सरकारने ठोस पावले उचलली आहे. राज्यात प्रथमच रत्नागिरी जिल्हा नवप्रवर्तन जिल्हा म्हणून घोषित करण्यात आला असून पुणे येथील प्रा.जगदाळे यांच्याकडे औद्योगिक विकास आराखडा तयार करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. आराखड्याला मंत्रिमंडळाने मंजुरी दिल्यानंतर देशासह परदेशातील उद्योग जिल्ह्यात आणण्यात येणार आहे. एमआयडीसीतील ताब्यात जागा विकसीत करण्याबरोबरच शेतकऱ्यांकडून जागा घेऊन तेथे उद्योग उभारले जातील.जिल्ह्यात १०० देशातील २,५०० वैज्ञानिक, संशोधक हे संशोधनासाठी येतील अशी व्यवस्था उभी केली जाणार आहे. या योजनेंतर्गत पर्यटन व्यवसायाला चालना दिली जाईल. तंत्रज्ञानावर आधारीत उद्योग आणण्यावर सरकार भर देणार आहे. यासाठी कारखान्यांना मार्गदर्शन करणारे अत्याधुनिक व सुसज्ज सेंटर येथे उभारले जाणार असल्याचेही सामंत यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेला मत्स्य व्यवसाय मंत्री ना. अब्दुल सत्तार उपस्थित होते.

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

Latest On Our Channel

YouTube player

Latest On Hub Encounter

YouTube player

Latest on Passay

YouTube player

Latest on Unsung hero

YouTube player
- Advertisement -spot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles