राजकीय ईर्षेतून आर.जी. पदाधिकाऱ्यावर हल्ला; आमदार विरेश बोरकर यांचा आरोप

0
268

 

रेव्होलुशनरी गोवन्स च्या दक्षिण गोवा जिल्ह्याचे अध्यक्ष रूबर्ट परेरा आणि सदस्य अंतूष रेबेल्लो यांच्यावर काल रविवारी बाणावली येथे अज्ञात जमावाने हल्ला केला. हा हल्ला राजकीय वैमनस्यातूनच झालेला असून, सध्या रूबर्ट परेरा हे आगामी लोक सभा निवडणुकीसाठी आर.जी. पक्षाचे उमेदवार यादीत आहे. आज रेव्होलुशनरी गोवन्स हा गोवेकरांच्या हक्कासाठी, गोवा गोवेकरांच्या हितासाठी झटत असून आर.जी. पक्षावरच आज लोक विश्वास ठेवत आहेत. त्यामुळे विरोधक भयभीत झालेले आहेत, आणि त्यामुळेच आमच्या पदाधिकाऱ्यांवर, आमच्या क्रांतिकारी सदस्यांवर हल्ला करण्याचे हिन दर्जाचे काम केले आहे. आज सामान्य गोवेकर शेतकऱ्याच्या कार्याची त्यांच्या कामाची दखल घेण्यासाठी गेले आसता आज आसा हल्ला करणे, ही लज्जास्पद गोष्ट आहे. आम्ही ह्या घटनेचा निषेध करत असल्याचे विरेश बोरकर यांनी कोलवा पोलिस स्थानकात तक्रार दाखल करण्यासाठी गेले असता म्हणाले.

आमच्यावर झालेला हा हल्ला राजकीय हेतुतून झालेला असून. आम्हाला आमच्या आर.जी. पक्षाला गोवेकराकडून मिळणारा प्रतिसाद, त्यांचे प्रेम बघून आज विरोधक घाबरलेले आहे. राजकीय ईर्षेपोटीच आमच्याच्यावर हल्ला करण्यात आला, असा आरोप रूबर्ट परेरा यांनी केला आहे. आम्ही आमचे गोवा गोवेकरसाठी काम करत राहणार आम्हाला कोणीच अडवू शकणार नाही आम्ही अशा हल्ल्यांना घाबरणार नसून आमचे कार्य चालूच राहणार असल्याचेही परेरा यांनी यावेळी म्हटले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here