रत्नागिरीत मुसळधार, चिपळूनमध्ये एनडिआरफ चे पथक दाखल

0
78

सिंधुदुर्ग – रत्नागिरी जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा दिल्यानंतर एनडीआरएफचे पथक आज चिपळूणमध्ये दाखल झाले. 25 जवानांसह आवश्यक ती यंत्रणा घेऊन हे पथक पुणे मार्गे चिपळूणमध्ये दाखल झाली आहे. चिपळूणमध्ये पुन्हा महापूर आल्यास नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यासाठी या पथकाची मोठी मदत होणार आहे. चिपळूणमध्ये गेली 17 तासाहून अधिक काळ मुसळधार पाऊस कोसळत होता त्यामुळे शहराच्या सखल भागात पाणी भरत होते. दरम्यान मंगळवारी दुपारी पाऊस ओसरला आहे.

 

 

22 जुलैला चिपळूणमध्ये महापूर आला. त्यावेळी हजारो नागरीक पुराच्या पाण्यात अडकले होते. त्यांना वाचवण्यासाठी एनडीआरएफला पाचारण करण्यात आले. परंतु पुणे मार्गे येताना सातारा कोयना येथे या टीमला अडथळ्यांचा सामना करावा लागला. त्यामुळे तब्बल 14 तास उशिरा चिपळूणमध्ये दाखल झाली. तत्पूर्वी स्थानिक पातळीवर बचावकार्य सुरू झाले होते. एनडीआरएफची टीम उशिरा दाखल झाल्यामुळे नागरिकांकडून प्रशासनावर टीकाही झाली होती.

 

रत्नागिरी जिल्ह्यात 9 सप्टेंबर पर्यंत मुसळधार पाऊस आणि अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. चिपळूणमध्ये गेली 17 तास मुसळधार पाऊस कोसळला. शहराच्या सखल भागात त्यामुळे सोमवारी रात्रीपासून पाणी भरत होते. मंगळवारी दुपारी पावसाने विश्रांती घेतल्यानंतर पाण्याचा निचरा होत आहे. परंतु प्रशासनाने 22 जुलै च्या महापुराचा धडा घेत पूर परिस्थिती हाताळण्यासाठी नियोजन केले आहे. शहरात विभागवार नोडल अधिकार्‍यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पाणी भरण्यास सुरवात झाल्यानंतर भोंगा वाजवून सतर्कतेचा इशाराही दिला जात आहे. 22 जुलै सारखी परिस्थिती झाली तर नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यासाठी अगोदरच एनडीआरएफ ची टीम बोलण्यात आली आहे. शहरातील माटे सभागृहात एनडीआरएफच्या टीमचा मुक्काम आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here