27 C
Panjim
Friday, January 21, 2022

रत्नागिरीत जेलमधील दहाजणांना कोरोना, एक डॉक्टरदेखील पॉझिटिव्ह

Latest Hub Encounter

 

सिंधुदुर्ग – कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सुरू झालेल्या लॉकडाऊनच्या पहिल्याच दिवशीच कोरोनाची सर्वात मोठी उलथापालथ झाली. नुकत्याच प्राप्त झालेल्या अहवालांनुसार रत्नागिरीतील एका उच्च प्रशासकीय अधिकाऱ्यासह एक डॉक्टर आणि जेलमधील दहाजणांसह रत्नागिरी तालुक्यात 17 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. नुकत्याच प्राप्त झालेल्या अहवालांमूळे भल्याभल्यांची झोप उडाली आहे. सर्वाधिक रुग्ण जेल मध्ये सापडले आहेत. एकाचवेळी जेलमधील 10 जणांना कोरोनाची लागण झाल्याने खळबळ उडाली आहे. जेलमधील दहा जणांमध्ये 8 कैदी तर दोन जेल पोलिसांचा समावेश आहे. एकाचवेळी जेलमधील दहा जणांना कोरोनाची लागण झाल्याने जेल प्रशासन हादरले आहे. याशिवाय आडिवरे येथील एकाला, रत्नागिरीच्या एका खासगी हॉस्पिटल मधील एक, आरोग्य मंदिर येथील एक तर गणेशगुळे येथील दोघांना कोरोनाची लागण झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

- Advertisement -