23 C
Panjim
Friday, January 28, 2022

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यापेक्षा राज्यातील कुठलाही सरपंच जास्त हुशार नारायण राणे यांची टीका

Latest Hub Encounter

 

सिंधुदुर्ग – राज्यातील कुठलाही सरपंच हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यापेक्षा जास्त हुशार आहे. महाविकासआघाडीचे सरकार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या कृपेमुळे बसलं आहे. नाहीतरं असा मुख्यमंत्री कोणी केला असता. उद्धव ठाकरेंचं कोणीही ऐकत नाही. अशी टीका भाजप नेते नारायण राणे यांनी केली आहे. ते सिंधुदुर्ग येथे बोलत होते.

महाविकासआघाडीचे सरकार पवारांच्या कृपेमुळे बसल

महाविकासआघाडीचे सरकार पवारांच्या कृपेमुळे बसल आहे. नाहीतर असा मुख्यमंत्री कोणी केला असता? या राज्यातील कोणताही सरपंच या मुख्यमंत्र्यांपेक्षा कितीतरी हुशार आणि कायदे माहिती असलेला आहे, असे नारायण राणे यावेळी म्हणाले आहेत. उद्धव ठाकरेंचे कोणीही ऐकत नाही. कारवाई केली तर हातात आहेत तीही लोक पळतील. असाही ते म्हणाले.

मंत्रालयात ते येत नाहीत

ते घरातून बोलतात. लोकांसमोर येऊन बोलत नाही. मंत्रालयात ते येत नाहीत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लोकांना सांगतात. इतरांना ५० माणसं जमवू द्यायची नाही आणि संजय राठोडवर काय कारवाई केली नाही. टीव्हीवरुन बोलत असताना लोकांना प्रश्न विचारतात तुम्ही काही उत्तर देत नाही. लोकं समोर नव्हते. त्यांचं कोणीही ऐकत नाही. म्हणूनच महाराष्ट्राची ही अवस्था आहे, असेही नारायण राणे म्हणाले.

त्या ऑडिओ क्लिपमध्ये आवाज कोणाचा

संजय राठोड यांच्या अनेक क्लिप बाहेर आल्यात. एवढं असताना चौकशी होत नाही. त्या ऑडिओ क्लिपमध्ये आवाज कोणाचा आहे. संभाषण कोणाचं आहे. तिला डॉक्टरकडे ने, हे कर ते कर, हा आवाज कोणाचा आहे. संजय राठोड १५ दिवसांनी सांगतात, भाजप कुटुंब उद्धवस्त करायला निघाले, भाजपला काही कामधंदे नाहीत का? असा सवालही राणेंनी उपस्थित केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

- Advertisement -