माधुरी दीक्षित सावंतवाडीत, पाहण्यासाठी चाहत्यांची गर्दी

0
153

सावंतवाडी व मळगाव परिसरात गेले काही दिवस सुरू असलेल्या पंचक या मराठी चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान सिनेसृष्टीतील आघाडीची नायिका ज्येष्ठ सिने अभिनेत्री माधुरी दीक्षित या मळगाव मध्ये दाखल झाल्या. चित्रपटाच्या सेटवर अभिनेत्री माधुरी दीक्षित या उपस्थित राहताच सर्वच कलाकार व तंत्रज्ञ मध्ये उत्साह संचारला. माधुरी दीक्षित मळगाव येथे आल्याची माहिती मिळताच त्यांना पाहण्यासाठी मोठी गर्दी उसळली. गेले काही दिवस मळगाव येथे या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू आहे. येथील पोकळे यांच्या निवासस्थानी हे चित्रीकरण सुरू असताना अभिनेत्री माधुरी दीक्षित या तिथे आल्या होत्या. या चित्रपटात आदिनाथ कोठारे मुख्य भूमिकेत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here