महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब म्हणाले नारायण राणे यांच्या ज्योतिष व्यवसायाला माझ्या शुभेच्छा

0
179

सिंधुदुर्ग – सप्टेंबर महिन्यात म्हविकास आघाडीच सरकार कोसळेल असं वक्तव्य नारायण राणे यांनी केल होत. याबाबत आपल मत काय असा प्रश्न आज कणकवली दौऱ्यावर आलेल्या परिवहन मंत्री अनिल परब यांना विचारला असता त्यांनी नारायण राणे यांच्या ज्योतिष व्यवसायाला माझ्या शुभेच्छा आहेत असा खोचक टोला लगावला आहे. म्हविकास आघाडीतील कोणीही आमदार नाराज नाहीत उलट त्या आमदारांची नाव तुम्हाला माहित असतील तर द्या त्यांना निधी देऊ असेही परब म्हणाले.

आज कणकवली एसटी आगाराच्या जागेची परिवहन मंत्री अनिल परब यांनी पाहणी केली. यावेळी त्यांच्या सोबत आमदार वैभव नाईक, जिल्हा बँक अध्यक्ष सतीशसावंत, अरुण दुधवडकर, कोकण सिंचन महामंडळाचे माजी उपाध्यक्ष संदेश पारकर, शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते आदी उपस्तित होते.

यावेळी बोलताना परिवहन मंत्री अनिल परब म्हणाले नारायण राणे यांनी ज्योतिषाचा व्यवसाय कधी सुरु केला हे मला माहित नाही. मात्र सध्या त्यांना काही काम नसल्याने त्यांनी हा व्यवसाय सुरु केला असावा, त्यांच्या या नव्या व्यवसायाला माझ्या शुभेच्छा असा टोला त्यांनी राणे याना लगावला. महाविकास आघाडी सरकारमधील काही आमदार निधी मिळत नसल्याने नाराज आहेत याबाबत आपले मत काय ? असे विचारले असता मंत्री अनिल परब म्हणाले कि, आपल्याला अशा आमदारांची नवे माहित असतील तर त्यांची यादी द्या त्यांना निधी देण्याची व्यवस्था करू. मात्र असे कोणीही आमदार नाराज नाहीत असा दावा त्यांनी यावेळी केला. आम्ही सरकारमध्ये असून आम्हाला माहित नाही तरीही तुम्हाला माहित असतील तर अशा आमदारांची नावे द्या त्यांच्याशी चर्चा करून त्यांना निधी देऊ असेही अनिल परब यावेळी म्हणाले.

एसटीची स्थिती अत्यंत वाईट आहे. लॉकडाऊन काळात एसटी पूर्णतः बंद होती. आता चालू झाली आहे ती ५० टक्के क्षमतेवर चालू झाली आहे. पूर्वी पूर्ण क्षमतेने सुरु होती तेव्हा एसटी तोट्यात होती. आता अर्ध्या क्षमतेवर धावणार आहे. त्यामुळे पूर्ण तोट्यात चालणार आहे.एसटीच्या इनधन बचतीसाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. इंधन बचत आम्ही करू शकलो तर एसटीचा मोठा तोटा कमी करता येणार आहे. तेव्हा हा तोटा भरून काढण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. ज्या एसटीची प्रवासी वाहतुकीची क्षमता संपली आहे त्या एसटी मधून मालवाहतूक सेवा आम्ही सुरु केली आहे. एसटीच्या जागेत आम्ही पेट्रोल पापं सुरु करत आहोत. असेही परब यावेळी म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here