महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस शुक्रवारी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार ?

0
139

देवेंद्र फडणवीस शुक्रवारी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार असल्याच्या शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसंच शिवसेनेने अडीच वर्ष मुख्यमंत्रिपदावर केलेला दावा आणि ५० टक्के मंत्रिपदांची मागणी सोडेल अशी अपेक्षाही भाजपाकडून व्यक्त करण्यात येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे २०१४ प्रमाणेच आपल्या दुसऱ्या कार्यकाळासाठी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील. तसंच शिवसेना भाजपासोबत सत्तेत सहभागी होईल, अशी शक्यताही व्यक्त करण्यात येत असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. टाईम्स ऑफ इंडियानं यासंदर्भातील वृत्त दिलं आहे. भाजपाचे वरिष्ठ नेते सध्या शिवसेनेची मनधारणी करण्याच्या प्रयत्नात असल्याचं दिसत आहे. देवेंद्र फडणवीस हे ३१ ऑक्टोबर किंवा १ नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील अशी माहिती एका नेत्यानं दिली. तसंच शिवसेनाही सत्तेत सहभागी होईल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. पुढील पाच वर्षांसाठी मीच मुख्यमंत्री होणार असं देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं होतं. ५०-५० चा फॉर्म्युला वगैरे काहीही ठरलेला नाही. एवढंच नाही तर पुढच्या आठवड्यात शपथविधी अपेक्षित आहे असंही देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी म्हटलं होतं. भाजपाच्या नेतृत्त्वातच सरकार स्थापन होईल. अगदीच आडमुठी घेणार नाही. तसंच काही मागण्या मेरिटवर तपासून पाहू असंही त्यांनी म्हटलं होतं. त्यानंतर शिवसेना आणि भाजपादरम्यान सत्तास्थापनेवर चर्चा करण्यासाठी आयोजित केलेली बैठक रद्द केली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here