महाराष्ट्रातील राष्ट्रवादीचे बेपत्ता आमदार दरोडा अखेर सापडले

0
117

 

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दौलत दरोडा शनिवारी सायंकाळपासून बेपत्ता होते. अखेर त्यांचा ठिकाणा सापडला असून, त्यांनी स्वतः समोर येत आपण सुरक्षित असल्याची माहिती दिली आहे. “शरद पवार आणि अजित पवार जो निर्णय घेतील, तो निर्णया मान्य असेल,” असं दरोडा यांनी म्हटलं आहे. शहापूर मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे आमदार दौलत दरोडा हे बेपत्ता असल्याची माहिती समोर आली होती. शनिवारी सायंकाळपासून ते घरी परतलेले नाहीत. याप्रकरणी पोलिसांतही तक्रार दाखल करण्यात आली होती. दरोडा नेमकं कुठे गेले याची शोधाशोध सुरू होती. दरम्यान, दुपारी अचानक दौलत दरोडा यांनी समोर आपण सुरक्षित असल्याची माहिती दिली. आमदार दरोडा म्हणाले, “मी सुरक्षित आहे. मी राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडून आलो आहे. त्यामुळं पक्षांतर करण्याचा प्रश्नच येत नाही. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि अजित पवार जो निर्णय घेतील, त्या निर्णयाला माझा पाठिंबा असेल. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका, असं आवाहनही दरोडा यांनी केलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here