महाराष्ट्राच्या राज्य पक्षाला सिंधुदुर्गमधील पक्षी निरीक्षकाने दिले जीवदान मालवण येथे सापडला होता हा पक्षी जखमी अवस्थेत

0
218

सिंधुदुर्ग – महाराष्ट्राचा राज्य पक्षी म्हणून ओळख असलेला हरियाल पक्षी जखमी असवस्थेत मालवणमधील पक्षी निरीक्षक उदय रोगे यांना सापडला. त्यांनी या हरियाल पक्षांवर उपचार करून त्याला नैसर्गिक अधिवासात सोडले आहे. विशेष म्हणजे कोकणात या पक्षाची मोठ्या प्रमाणावर शिकार होते. त्यामुळे या पक्षांचे अस्थित्व धोक्यात आले आहे.

हरियाल हा कबूतर वंशीय पक्षी असून तो महाराष्ट्राचा ‘राज्यपक्षी’ आहे. याला हिरवा होला, हरोळी किंवा पिवळ्या पायाची हरोळी या नावांनीही ओळखला जातो. हा पक्षी दुर्मिळ पक्षी असून याचे शास्त्रीय नाव ‘ट्रेरॉन फोनिकॉप्टेरा’ आहे. पाचू-कवडा नावाचे जे कबूतर आहे त्याच्या अंगावरील पाचूसारखी हिरवी झाक व पिवळ्या, निळ्या, जांभळ्या अशा कितीतरी रंगांच्या छटा हरियाल या पक्षाच्या अंगावर असतात.

‘हरियाल’ (हिरवे कबूतर) हा पक्षी राज्यपक्षी म्हणून ओळखला जातो. ‘ट्रेशन फोनिकोप्टेरा’ असे या पक्ष्याचे शास्त्रीय नाव आहे. गर्द हिरव्या झाडांची ठिकाणे, प्रामुख्याने वड, पिंपळ, उंबर, अंजीर या सारख्या झाडांच्या सान्निध्यात या पक्ष्यांचे वास्तव्य असल्याचे पाहावयास मिळते. हा कबूतर वंशीय पक्षी आहे. हरियाल महाराष्ट्राचे मानचिन्ह म्हणून ओळखला जातो. निळसर कबूतराच्या आकाराचा, मजबूत बांध्याचा हा पक्षी आहे. रंग पिवळा, राखट करडा, खांद्यावर जांभळ्या रंगाचा डाग असतो. याचे पिवळे पोट ही याला ओळखण्याची मुख्य खूण आहे.

सकाळी लवकर किंवा संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळी हे पक्षी अन्न मिळविण्यासाठी बाहेर पडतात. फळांनी लगडलेल्या फांदीवर हा पक्षी अतिशय कुशलपणे फळे तोडताना दिसतो. जरासाही धोका जाणवल्यास जागच्या जागी थिजून थांबतो. झाडात याचा रंग इतका बेमालूमपणे मिसळतो, की तो सहजासहजी दिसत नाही. जास्त काळ आकाशात उडणारा पक्षी म्हणून सुद्धा या पक्षाची नोद आहे. हा पक्षी जमिनीवर येत नाही, तो जखमी असला तरच जमीनीवर उतरतो. अशी माहिती पक्षी निरीक्षक उदय रोगे यांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here