26 C
Panjim
Thursday, August 11, 2022

महाराष्ट्रवासियांच्या आशीर्वादाने उपमुख्यमंत्री अजित पवार कोरोनावर सहज मात करतील – अनंत पिळणकर

spot_img
spot_img

सिंधुदुर्ग – महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी नेहमीच सामान्य माणूस, शेतकरी, कष्टकरी, दलित, आदिवासी नजरेसमोर ठेऊन राज्याच्या विकासाला गती दिली आहे. सामान्यजनांचे जीवनमान उंचावण्यासाठी प्रयत्न केले आहेत. त्यामुळे या महाराष्ट्रवासियांच्या आशीर्वादाने ते लवकरात लवकर कोरोनावर मात करतील व पुन्हा नव्या दमाने लोकसेवेत दाखल होतील असा विश्वास राष्ट्रवादीचे उपजिल्हाध्यक्ष अनंत पिळणकर यांनी व्यक्त केला आहे. शर्यत कोणतीही असो हार हि कधीच आमच्या नेत्याने पहिली नाही, कोरोनाच काय घेऊन बसला असेही पिळणकर यावेळी म्हणाले.

राज्य आणि देशसेवेत पवार कुटुंबीयांनी स्वतःला वाहून घेतले आहे. अजितदादा हे स्वतःला झोकून देऊन काम करतात. त्यांच्या कामाचा धडाका मोठा आहे. आज राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राज्याचे अर्थमंत्री म्हणून त्यांनी कोरोनकाळात राज्यातील जनतेला विश्वास दिला. शिवाय राज्याची अर्थव्यवस्था ढासळत नये याचीही काळजी घेतली. शेतकऱ्यांना कर्जमाफी देताना निसर्ग चक्रीवादळात कोलमडलेल्या कोकणातील बागायतदार व शेतकऱ्याला पुन्हा उभे करण्यासाठी राज्याची तिजोरी खुली केली. आता पुन्हा एकदा अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे होत्याचे नव्हते केले तेव्हाही राज्याचे अर्थमंत्री म्हणून ते ठामपणे शेतकऱ्यांच्या बाजूने उभे राहिले. अशा अजितदादांना कोरोनाने गाठले असले तरी आजवर कुठच्याही शर्यतीत मागे न राहणारे आमचे दादा याही संकटातून सहज बाहेर पडतील. असा विश्वास यावेळी अनंत पिळणकर यांनी बोलताना व्यक्त केला.

triumph-high school-ad
- Advertisement -spot_img
spot_img
- Advertisement -spot_img

Latest On Hub Encounter

YouTube player

Latest on Passay

YouTube player
YouTube player

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

- Advertisement -spot_img