महाड एमआयडीसी भीषण स्फोट; अकरा कामगार बेपत्ता, चौघांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज

0
121

 

रायगड जिल्ह्यात महाड एमआयडीसी येथे ब्ल्यू जेट हेल्थकेअर लिमिटेड या कंपनीत शुक्रवारी 3 नोव्हेंबर रोजी सकाळी लागोपाठ स्फोट होऊन आग लागल्याने तब्बल 11 कामगार अडकल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. साडेदहा वाजता पहिला स्फोट झाला त्यानंतर आठ दहा स्फोट झाल्याने महाड एमआयडीसी हादरली असून हा स्फोट झाला त्यावेळी 57 कर्मचारी या कंपनीत होते. यामधील तीन ते चार जणांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर पास झाल्यावरती महाड येथील एका हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. नागोरे येथून रिलायन्स कंपनीचे तज्ञांचे पथक पाचन करण्यात आले असून हे पथक आल्यानंतर कंपनीत प्रवेश करून या बेपत्ता कामगारांचा शोध तातडीने घेतला जाणार अरे अशी माहिती रायगड जिल्ह्यातील महाड तालुका प्रशासनाकडून देण्यात आली. माहिती प्रांताधिकारी ज्ञानेश्वर बनापुरे, पोलीस प्रशासन नगरपरिषद प्रशासन आदी घटनास्थळी दाखल झाले आहेत.बेपत्ता कामगारांचा शोध सुरू आहे. आग नियंत्रणात असली तरी जिल्ह्यातील अनेक अग्निशमन यंत्रणा, पाण्याचे टँकर घटनास्थळी उपस्थित आहेत.

स्फोटानंतर प्लांट मध्ये लागली आग लागली आहे. यानंतर अग्नीशमन यंत्रणा, पोलीस घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन वाहनांकडून परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here