सिंधुदुर्ग – कणकवली पोलीस ठाण्यातही कोरोनाचा शिरकाव झाला आहे. एका पोलीस कॉन्स्टेबलचा स्वॅब टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. हा पोलीस कर्मचारी सुट्टीवर कोल्हापूर जिल्ह्यातील आपल्या गावी गेला होता. त्याची सुट्टी संपल्यानंतर तो ड्युटीवर हजर होण्याआधी स्वॅब टेस्ट केली होती. स्वॅब टेस्ट दिल्यानंतर तो होम क्वारंटाईन होता. स्वॅब टेस्ट रिपोर्टमध्ये त्या पोलीस कॉन्स्टेबलचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. जिल्हा रुग्णालयाच्या कोव्हीड केअर सेंटरमध्ये या पोलीस कॉन्स्टेबलला उपचारासाठी दाखल करण्यात आले. दरम्यान जिल्हा पोलिस अधीक्षक गेडाम यांच्या सूचनेनुसार जिल्ह्याबाहेर गेलेल्या प्रत्येक अधिकारी अथवा कर्मचाऱ्याची ड्युटीवर हजर होण्याआधी स्वॅब टेस्ट केली जातेय. स्वॅब रिपोर्ट येईपर्यंत त्या अधिकारी अथवा कर्मचाऱ्याला होम क्वारंटाईन केले जाते. तर निगेटिव्ह रिपोर्ट आल्यानंतरच ड्युटीवर हजर केले जाते. त्यामुळे अन्य कर्मचाऱ्यांचे कोरोना संसर्गापासून संरक्षण होतेय.
पोलीस कॉन्स्टेबलचा स्वॅब टेस्ट रिपोर्ट आला पॉझिटिव्ह, कणकवली पोलीस ठाण्यातही कोरोनाचा शिरकाव
