पुन्हा पाच वर्षांसाठी मीच मुख्यमंत्री – देवेंद्र फडणवीस वर्षा निवास्थानी पत्रकारांसोबत चर्चा करताना केले वक्तव्य

0
138

पुढील पाच वर्षांसाठी मीच मुख्यमंत्री होणार असं देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे. ५०-५० चा फॉर्म्युला वगैरे काहीही ठरलेला नाही असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. एवढंच नाही तर पुढच्या आठवड्यात शपथविधी अपेक्षित आहे असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. पत्रकारांना आज दिवाळी फराळानिमित्त वर्षावर बोलवण्यात आलं होतं. त्यावेळीच देवेंद्र फडणवीस यांनी हे वक्तव्य केलं आहे.

फडणवीस यांच्या या वक्तव्याने सेनेचा मात्र चांगलाच तिळपापड होणार आहे. ५०-५० चा फॉर्म्युला घेऊन बसलेल्या शिवसेनेला हा एकप्रकारे फडणवीस यांनी इशाराच दिल्याचे मानले जाते. आता या वक्तव्यानंतर सेनेकडून काय प्रतिक्रिया येते हे महत्वाचे आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here