28 C
Panjim
Monday, May 23, 2022

नितेश राणेंना न्यायालयाचा झटका ; अटकपूर्व जामीन फेटाळला गोट्या सावंत यांचाही अटकपूर्व जामीन नामंजूर

spot_img
spot_img
spot_img

Latest On Hub Encounter

Latest on Passay

सिंधुदुर्ग – शिवसैनिक संतोष परब वरील हल्ल्याच्या गुन्ह्यात भाजपा आमदार नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन फेटाळून सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयाने त्यांना झटका दिला आहे. त्यामुळे आता नितेश राणेंवर अटकेची टांगती तलवार असून अटक टाळण्यासाठी नितेश राणेंना हायकोर्टात धाव घ्यावी लागणार आहे. सोबतच गोट्या सावंत यांचाही अटकपूर्व जामिन फेटाळला गेल्यामुळे त्यांच्याही अडचणींत वाढ झाली आहे.

जिल्हा बँक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात राजकीय वातावरण चांगलेच तापले असून नितेश राणे आणि गोट्या सावंत यांनी दाखल केलेल्या अटकपूर्व जामीन सुनावणीच्या युक्तिवादासाठी सरकारी पक्षातर्फे मुंबईहून दोन विशेष सरकारी वकिलांची नियुक्ती करण्यात आली होती. २८ डिसेंबर रोजी जिल्हा प्रधान सत्र न्यायाधीशांसमोर झालेल्या अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी झाली. नितेश राणे यांच्या वतीने वकील संग्राम देसाई यांनी तर गोट्या सावंत यांच्या वतीने वकील राजेंद्र रावराणे यांनी अटकपूर्व जामीन मंजूर करण्यासाठी जोरदार युक्तिवाद केला. मात्र सरकारी वकिलांचा युक्तिवाद अपूर्ण राहिल्याने बुधवारी दुपारी अटकपूर्व जामीन अर्जावरील उर्वरित कामकाज पार पडले. त्यानंतर अटकपूर्व जामिनावर गुरुवार ३० डिसेंबर रोजी निर्णय होणार असल्याचे जिल्हा प्रधान सत्र न्यायाधीश हांडे यांनी सांगितले. यावर आज निर्णय देताना सरकारी वकिलांच्या म्हणण्यानंतर प्रधान सत्र न्यायाधीशांनी आमदार नितेश राणे आणि गोट्या सावंत यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला आहे. त्यामुळे नितेश राणे आणि गोट्या सावंत यांच्यासमोरील अडचणींत वाढ झाली आहे.

राणे यांचा कोर्टाने जामीन फेटाळला जिल्ह्यात ठिकठिकाणी फटाक्यांची आतषबाजी

आमदार गाणे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळल्यानंतर कणकवली कुडाळ या ठिकाणी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. शिवसेना कार्यकर्त्यांनी फटाके वाचवत आनंद साजरा केला.

elthor-showroom-ad
triumph-high school-ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

- Advertisement -spot_img