नारायण राणे यांचा सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत यांच्यावर आरोप, म्हणाले नियोजन मधे आमदार आणि सदस्यांनी दिलेली कामे पालकमंत्री उदय सामंत हे नियमबाह्य पद्धतीने बदलतात जिल्हाधिकारी यांची घेतली भेट

0
95

सिंधुदुर्ग – पालकमंत्री उदय सामंत हे जिल्हा नियोजनची आमदार आणि सदस्यांनी सुचवलेली कामे थांबतात नियमबाह्य पद्धतीने ती बदलली जातायत हे थांबवाव. तसेच जिल्ह्यातील विकास कामे जी रखडली आहेत ती सुरू करावीत. परतीच्या पावसामुळे भातशेतीचे मोठं नुकसान झाले आहे त्याची नुकसान भरपाई शेतकऱ्यांना द्यावी अशी मागणी त्यांनी आज जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांची भेट घेऊन केली. मात्र शासनाचे पैसे अजून जिह्यात पोचलेच नसल्याचा आरोप देखील नारायण राणे यांनी केला आहे.

यावेळी बोलताना खासदार नारायण राणे म्हणाले कि विकास कामे तात्काळ सुरु करावीत, नुकसंग्रस्थ शेतकऱ्यांना तात्काळ मदत करावी अशी मागणी आपण जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे. तसेच चिरेखान व्यावसायिकांना अल्प मुदतीत परवाने जे रद्द केलेत ते करू नयेत अशी आपली मागणी असल्याचेही त्यांनी सांगितले. विकासकामांसाठी शासनाचे पैसे अजून पोचले नाहीत असेही ते यावेळी म्हणाले.

खासदार नारायण राणे यांनी यावेळी पालकमंत्री उदय सामंत यांच्यावर आरोप केला. पालकमंत्री हे जिल्हा नियोजन विभागाच्या बैठकीत आमदार आणि सदस्य सुचवत असलेली कामे परस्पर बदलत असल्याचे म्हटले आहे. पालकमंत्र्यांची हि कृती नियमबाह्य आहे. हे थांबवा अशी विनंती आपण जिल्हाधिकारी याना केली असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here