26 C
Panjim
Thursday, August 11, 2022

गोवा-पर्वरी खूनातील दोन आरोपी कणकवली तळेरे येथून ताब्यात, सिंधुदुर्ग-गोवा पोलिसांची संयुक्त कारवाई

spot_img
spot_img

सिंधुदुर्ग – गोवा पर्वरी पोलीस स्टेशनमधील खुनाच्या गुन्ह्यातील दोघा संशयित आरोपींना आज तळेरे येथून ताब्यात घेण्यात आले. मोबाईल लोकेशनवरून या दोघांचा ठावठिकाणा लागला. त्यांनतर गोवा पोलिस आणि सिंधुदुर्ग पोलिस एलसीबीच्या पथकाने त्यांना फॉर्च्युनर कारसह ताब्यात घेतले.

तळेरे येथून ताब्यात घेतलेल्या आरोपींमध्ये पवन श्रीकांत बडीगर ( रा.म्हापसा) आणि प्रशांत लक्ष्मण दाभोलकर (रा.बार्देश गोवा) यांचा समावेश आहे. खुनाची घटना घडल्यानंतर हे दोघेही फरार होते. ते तळेरे येथे भाड्याच्या खोलीत राहत असल्याची माहिती पोलिसांना समजली होती. त्यानंतर एलसीबी पोलीस उपनिरीक्षक सचिन एम शेळके यांच्या पथकाने तळेरे गावात दोन्ही संशयिता आरोपींना ताब्यात घेतले. त्याच्या ताब्यातील फॉर्म्युनर कार (जीए-०३-वाय ०९९०) देखील जप्त करण्यात आली आहे. आज या दोन्ही आरोपीना कणकवली पोलीस ठाण्यात आणून नोंद करण्यात आली. त्यानंतर पेडणे पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जीवबा दळवी आपल्या पथकासह कणकवली पोलीस ठाण्यात दाखल झाले. पर्वरी पोलीस ठाण्यातील गुन्हा रजिस्टर नं १३१ / २०२० नुसार भा.दं. वि .३०२ मधील गुन्ह्यातील वरील दोन्ही आरोपी असल्याने त्यांना आरोपीना आपल्या ताब्यात घेऊन गोवा पोलीस गोव्याला घेवून गेले आहेत. ही कारवाई पीएसआय सचिन शेळके यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रामचंद्र शेळके , पोलीस नाईक कृष्णा केसरकर , जयेश सरमळकर , ज्ञानेश्वर कांदळगावकर , संकेत खाडये या पथकाने केली.

triumph-high school-ad
- Advertisement -spot_img
spot_img
- Advertisement -spot_img

Latest On Hub Encounter

YouTube player

Latest on Passay

YouTube player
YouTube player

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

- Advertisement -spot_img