25.7 C
Panjim
Sunday, November 27, 2022

नारायण राणेंनी सरकारवर टीका करण्याचं धारीष्ठ करू नये शिवसेना सचिव खासदार विनायक राऊत यांचा इशारा

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

 

सिंधुदुर्ग – खासदार नारायण राणे यांच्या पत्रकार परिषदेनंतर आता शिवसेनेने राणे यांच्यावर निशाणा साधला आहे. राणे यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका करण्याचं धारीष्ठ करू नये असा इशारा शिवसेना सचिव खासदार विनायक राऊत यांनी दिला आहे. ज्याचं राजकीय आयुष्यचं मेवा लूबाडण्यात गेलं त्या नारायण राणेंनी अनिल परब यांच्यावर किंवा सरकारवर बोलू नये असा पलटवार शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी केला आहे.

नारायण राणेंच्या विरूद्ध आज आपच्याकडे अनेक पुरावे आहेत

उद्योगमंत्री असताना नारायण राणेंनी अनेक जमिनी हडप केल्या. मग त्या वन खात्याच्या असतील किंवा एमआयडीसीच्या असतील त्यांची अनेक प्रकरणं आज सुद्धा बाहेर येतायत. त्यामुळे त्यांचं आयुष्यचं लुबाडणूकीत गेलं, त्यांनी अनिल परबना शहानपणा शिकवण्याची गरज नाही. असेही विनायक राऊत यावेळी म्हणाले.

नारायण राणे हे सत्तेच्या खुर्चीसाठी झपाटलेले गृहस्थ

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे अत्यंत संयमाने आणि तेवढ्याचं निर्धाराने महाराष्ट्रात कोरोना नियंत्रणात ठेवण्याचं काम करत आहेत. हे महत्त्वाचं आहे. महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे जिथे शिस्तीचं आणि कोरोना नियंत्रित ठेवण्याचं पूर्णपणे पालन केलं जातंय. मात्र, ज्यांना काविळ झालेली त्यांना सगळचं पिवळं दिसतं. नारायण राणे हे सत्तेच्या खुर्चीसाठी झपाटलेले गृहस्थ आहेत. त्यांना खुर्ची मिळत नाही म्हणून वेडापीसा झालेला हा माणूस आहे. त्यामुळेच ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर अशा पद्धतीने बरळत आहेत. त्यांना जे बरळायचं असेल, ते बरळू दे, मात्र शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे संयमाने आणि निर्धाराने कोरोना नियंत्रणात ठेवण्याचं काम करत आहेत. असेही राऊत यावेळी म्हणाले.

नारायण राणे नेमके काय म्हणाले होते ?

अनिल परब हे सेवाभावी मंत्री आहेत. जमा करण्याचं आणि आणून द्यायचं काहीही कमिशन न घेता. म्हणून त्यांची चौकशी करावी. सेवा आणि मेवा कसा जमा केला, कुठून नेऊन पोहोचवला याची चौकशी झाली पाहिजे, असं राणे म्हणाले. दीड हजार घ्या, पाचशे घ्या. शंभर घेऊन जा. हे काय आहे. चेष्टा आहे लोकांची. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री असा असू शकतो, रडत लक्ष्मी अशी टीकाही नारायण राणे यांनी केली होती. राज्य आहे, राज्याला स्वत:साठी लागणारा पैसा निर्माण करण्याचा अधिकार घटनेने दिलाय. त्यामुळे जरा संविधान वाचा. मातोश्रीच्या पिंजऱ्यात बसून काय राहता ?, असा सवाल करतानाच माणसं मरत आहेत. 60 हजार लोकं मेलं आहेत. राज्य दिवाळखोरीकडे जात आहे. दीड हजार रुपये जाहीर करण्याचं काम क्लार्कचं आहे. मुख्यमंत्री म्हणून तुम्ही काय देता? असा सवालही राणेंनी केला होता.

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

Latest On Our Channel

YouTube player

Latest On Hub Encounter

YouTube player

Latest on Passay

YouTube player

Latest on Unsung hero

YouTube player

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img