26 C
Panjim
Thursday, August 11, 2022

नानार प्रकल्पाला विरोध करणाऱ्या खासदार विनायक राऊत याना बॉयकॉट करा भाजपा प्रदेश चिटणीस प्रमोद जठार यांचे मत

spot_img
spot_img

सिंधुदुर्ग – राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी नानार प्रकल्पाबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीदेखील आपली भूमिका स्पष्ट केली आहे. मात्र खासदार विनायक राऊत यांच्या हट्टीपणामुळे या प्रकल्पाला खीळ बसली आहे. त्यामुळे कोकणातील जनतेने या खासदाराला बॉयकॉट करा. असे भाजपाचे प्रदेश चिटणीस माजी आमदार प्रमोद जठार यांनी म्हटले आहे.

जिल्हा दौऱ्यावर आले असताना प्रमोद जठार बोलत होते. यावेळी ते म्हणाले, नानार सारखे प्रकल्प व्हायलाच हवेत, त्याच्याशिवाय विकास होणार नाही. असं मत कोकण दौऱ्यावर आलेल्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केले. राष्ट्रवादी काँग्रेसने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. काँग्रेसच्या स्थानिक आमदार हुसनबानू खलिपे यांनीही आपली भूमिका स्पष्ट केली कि प्रकल्प व्हायला हवेत. शिवसेनेच्या बाबतीत उद्धव ठाकरे यांनी यापूर्वीच सांगितलं कि संघटना निराळी आणि सरकार निराळं. सरकारमध्ये ते मुख्यमंत्री म्हणून बसलेत तेव्हा त्यांचहि म्हणणं प्रकल्प झालाच पाहिजे. फक्त एका माणसाच्या हट्टीपणामुळे, सिंधुदुर्ग रत्नागिरीचे खासदार विनायक राऊत यांच्या हट्टीपणामुळे शिवसेनेला आज एकाकी पडावं लागलेलं आहे. माझतर म्हणणं आहे शिवसेनेने आणि कोकणातल्या जनतेने या खासदार विनायक राऊतांना बॉयकॉट करावं. विकासाच्या विरुद्ध हट्टीपणाची भूमिका ठेऊन असलेल्या या खासदाराला बॉयकॉट करा असे ते यावेळी म्हणाले.

triumph-high school-ad
- Advertisement -spot_img
spot_img
- Advertisement -spot_img

Latest On Hub Encounter

YouTube player

Latest on Passay

YouTube player
YouTube player

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

- Advertisement -spot_img