धक्कादायक… पतीच्या हत्येनंतर पत्नीची आत्महत्या

0
38729

सिंधुदुर्ग – सिंधुदुर्गातल्या देवगड तालुक्यातील मिठबांव येथील प्रसाद परशुराम लोके या तरुणाचा चार दिवसांपूर्वी मुणगे-मसवी रस्त्यावर निर्घृणपणे खून झाला होता. त्यानंतर गुरुवारी पहाटेच्या सुमारास प्रसाद यांची पत्नी मनवा प्रसाद लोके (वय २७) यांनी घराच्या टेरेसवर ओढणीच्या सहाय्याने गळफास लावून आत्महत्या केली. प्रसाद यांच्या खुनाचा तपास गुंतागुंतीचा होत असतानाच पतीच्या निर्घृण हत्येनंतर त्या नैराश्यात होत्या. त्याच तणावामध्ये त्यांनी आत्महत्या केल्याची नोंद पोलिसांनी केली आहे. असे असले तरी त्यांच्या आत्महत्येमुळे खून प्रकरणाच्या तपासाचा अधिक गुंता वाढला आहे.

मिठबांव येथील प्रसाद परशुराम लोके (वय ३१) यांचा सोमवारी सकाळी मुणगे-मसवी रस्त्यावर त्याच्याच गाडीच्या बाजूला रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह आढळला होता. त्यांच्या डोक्यावर, कपाळावर वार करून निर्घृण खून करण्यात आला होता. खून प्रकरणी प्रसाद यांच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी तपास करून किशोर परशुराम पवार रा. कुंभारमाठ याला अटक केली होती. बुधवारी सकाळी संशयिताला मालवण येथे नेऊन त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेले हत्यार, गाडी व रक्ताचे डाग असलेले कपडे ताब्यात घेतले होते.

दरम्यान, मनवा यांच्या आत्महत्येमुळे देवगड तालुक्यात खळबळ निर्माण झाली आहे. निर्घृण झालेल्या प्रसाद यांची पत्नी मनवा यांनी ओढणीच साहाय्याने गळफास घेऊन आपले जीवन संपवले. मनवा पतीच्या निर्घृण हत्येनंतर घरी मिठबांव येथे आई अर्चना अरविंद घाडीगावकर (वय ५३, रा. मालवण देऊळवाडा) हिच्यासमवेत रात्री झोपल्या होत्या.

गुरुवारी पहाटे मनवा हिचे सासरे परशुराम लोके यांना ६ वाजेच्या सुमारास टेरेसेवरील आणि जिन्यामधील लाईट सुरू असल्याचे निदर्शनास आल्याने त्यांनी मनवाच्या सासूला उठविले. यावेळी आपल्या बाजूला झोपलेली मनवा बाजूला नसल्याचे लक्षात आले. त्यानंतर सासरे परशुराम लोके, सासू, दीर या सर्वांनी तिचा शोध घेतला. यावेळी घराच्या टेरेसवर जाण्याचा दरवाजा उघडा दिसला. त्यांनी टेरेसवर जाऊन पाहिले असता टेरेसवर शेडच्या लोखंडी अँगलला मनवा ओढणीने गळफास लावलेल्या स्थितीत आढळून आल्या. आत्महत्येची माहिती पोलीस स्टेशनला देण्यात आली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर गळफास लावलेल्या स्थितीतील मृतदेह खाली काढण्यात आला. त्यानंतर मृतदेह शवविच्छेनासाठी देवगड ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला. पोलीस ठाण्यात आकस्मिक म्हणून मृत्यूची नोंद करण्यात आली.

खून प्रकरणाचा गुंता वाढला असून पतीचा घातपाती मृत्यू झाल्याने तेव्हापासून त्या नैराश्यात होत्या. त्याच तणावामध्ये ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. असं असलं तरी पतीच्या खून प्रकरणानंतर तीन दिवसांनी पत्नीने गुढरित्या आत्महत्या केल्यामुळे या खून प्रकरणाचा गुंता अधिक तीव्र झाला आहे. प्रसाद यांच्या खून प्रकर संशयित किशोर पवार याला अटक केली असली तरी त्याने अद्यापही खून कोणत्या कारणासाठी केला याची माहिती पोलिसांना दिलेली नाही. याबाबतचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here